असुविधा अन् नागरिकांमध्ये असंतोष अतिक्रमण हटावचे पडसाद: पर्यायी जागांवर असुविधा, नागरिकांचाही विरोध
By admin | Published: February 08, 2016 10:55 PM
जळगाव : हॉकर्सचे स्थलांतर करताना त्यांना दिलेल्या पर्यायी जागांवरून हॉकर्स समाधानी नाहीत तसेच त्या भागातील नागरिकांमध्येही कमालीचा असंतोष दिसून येत असून काहींनी तर थेट महापालिका गाठून आपली नाराजी व्यक्त केली.
जळगाव : हॉकर्सचे स्थलांतर करताना त्यांना दिलेल्या पर्यायी जागांवरून हॉकर्स समाधानी नाहीत तसेच त्या भागातील नागरिकांमध्येही कमालीचा असंतोष दिसून येत असून काहींनी तर थेट महापालिका गाठून आपली नाराजी व्यक्त केली. हॉकर्सच्या स्थलांतरास सोमवारी मुहूर्त लाभला मात्र पहिल्याच टप्प्यात हॉकर्स व नागरिकांच्या असंतोषास महापालिका आतिक्रमण विभागास सामोरे जावे लागत आहे. रस्ता झाला मोकळा पण..चित्रा चौक ते शिवाजी पुतळ्यासमोरील रस्त्यात काही काळ मोकळा श्वास घेतला. मात्र दुपारनंतर काही गाड्या गोलाणी मार्केट समोर लागलेल्या दिसत होत्या. यात फळ विक्रेत्याचा समावेश होता. चित्रा चौक ते नेहरू पुतळा या भागातील हॉकर्सना पर्यायी जागा इंडो अमेरिकन हॉस्पिटलच्या पुढील एका बोळीत देण्यात आली आहे. मात्र तेथे कोणत्याही सुविधा उपलब्ध नसून त्या भागातील नागरिकांकडूनही गल्लीत हॉकर्सला दुकाने लावण्यात विरोध होत आहे. काही नागररिकांनी या विरोधात थेट महापालिका गाठून आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र ते न भेटल्याने नागरिकांना परतावे लागले. तसेच या गल्लीत शौचालयांच्या टाक्या व घाण असल्याने ग्राहक येणार कसे असा सवाल हॉकर्सकडून केला जात होता. ----असुविधा अन् अगोदरच अतिक्रमणकाही हॉकर्सनला ट्राफीक गार्डन परिसरातील जागा देण्यात आली आहे. तेथेही घाणीचे साम्राज्य पसलेले दिसून आले. पांढरा चुना टाकून सकाळी मारलेले पे दुपारनंतर गायब होते. या ठिकाणी एकाही हॉकर्सने आपल्या गाड्या लावल्या नव्हत्या तर या परिसरात अगोरदरच काही गॅरेज चालकांचे अतिक्रमण असल्याचे दिसून आले. काही हॉकर्सला महापालिकेच्या मागील गल्लीत दिलेल्या जागेवर मात्र तीन चार हॉकर्सने गाड्या लावल्याचे दिसत होते. मात्र तेथेही पाणी साचलेले, साफसफाई नसल्याचे दिसून आले.