कॅबिनेट विस्तारापूर्वी पंजाब काँग्रेसमध्ये मतभेद, अनेक आमदार नाराज, वादग्रस्त राणा गुरजित सिंगविरुद्ध उघडली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 04:02 PM2021-09-26T16:02:18+5:302021-09-26T16:02:53+5:30

Punjab Politics News: नेतृत्व बदल करून पक्षश्रेष्ठींनी पंजाब काँग्रेसमधील वाद संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता कॅबिनेट विस्तारावरून पंजाब काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Disagreements in Punjab Congress before cabinet expansion, many MLAs angry, open front against controversial Rana Gurjit Singh | कॅबिनेट विस्तारापूर्वी पंजाब काँग्रेसमध्ये मतभेद, अनेक आमदार नाराज, वादग्रस्त राणा गुरजित सिंगविरुद्ध उघडली आघाडी

कॅबिनेट विस्तारापूर्वी पंजाब काँग्रेसमध्ये मतभेद, अनेक आमदार नाराज, वादग्रस्त राणा गुरजित सिंगविरुद्ध उघडली आघाडी

Next

नवी दिल्ली - नेतृत्व बदल करून पक्षश्रेष्ठींनी पंजाबकाँग्रेसमधील वाद संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता कॅबिनेट विस्तारावरून पंजाबकाँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वातील पंजाब सरकारच्या कॅबिनेट विस्ताराच्या काही तास आधी पंजाब काँग्रेसमधील नेत्यांनी माजी मंत्री राणा गुरजित सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या एका गटाने प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पत्र लिहून वादग्रस्त माजी मंत्री राणा गुरजित सिंग यांना कॅबिनेटमध्ये घेऊ नये, अशी मागणी केली आहे. ( Disagreements in Punjab Congress before cabinet expansion, many MLAs angry, open front against controversial Rana Gurjit Singh)

गुरजित सिंग यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये सहा आमदार आणि एका माजी प्रदेशाध्यक्षाचा समावेश आहे. गुरजित सिंग ऐवजी एका स्वच्छ दलित नेत्याला कॅबिनेटमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. या पत्राची एक प्रत मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना पाठवण्यात आली आहे. पंजाबच्या कॅबिनेटमध्ये सात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. तर अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी असलेल्या ५ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार परगट सिंग, राजकुमार वेगका, गुरकीरत सिंग कोटली, संगत सिंग गिलजियान, अमरिंदर सिंग राजा वारिंग, कुलजित नागरा आणि राणा गुरजित सिंग यांचा कॅबिनेटमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र या नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही.

चन्नी सरकारमधील पहिल्या कॅबिनेट विस्तारासाठी नावांना अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत चन्नी, सिद्धू आणि अन्य नेत्यांना पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वासह सल्ला-मसलत केल्यानंतर ७ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र या सात नावांबाबत पंजाब काँग्रेसमध्ये एकमत दिसून येत नाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिद्धू यांना राणा गुरमित यांच्याविरोधात पत्र लिहिले गेले आहे. 

Web Title: Disagreements in Punjab Congress before cabinet expansion, many MLAs angry, open front against controversial Rana Gurjit Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.