नवी दिल्ली: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास गेला आहे. दरम्यान, या प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र गिरी यांनी ज्या दोरीने गळफास घेतला, ती दोरी त्यांचा शिष्य सर्वेश यांनी त्यांना आणून दिली होती.
शास्त्रज्ञ पहिल्यांदाच उतरले लाखो वर्षे जुन्या 'नरकाच्या खड्ड्यात', आढळल्या 'या' विचित्र गोष्टी
याबाबत सांगताना सर्वेश म्हणाले की, 'मला गुरुजींना कपडे सुकवण्यासाठी नायलॉनची दोरी आणण्यास सांगितली होती. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी त्यांना दोरी आणून दिली. पण, ते याच दोरीने आत्महत्या करतील असा कधी विचारही केला नव्हता. मला थोडाही संशय आला असता, तर मी त्यांना कधीच दोरी आणून दिली नसती.
कोर्टाच्या आवारात गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या, दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काउंटर
महंत नरेंद्र गिरी सोमवार(दि.20) रोजी प्रयागराजमधील बाघंब्री मठातील त्यांच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. दुपारचे जेवण केल्यानंतर ते विश्रांती घ्याचचे आणि संध्याकाळी त्यांच्या खोलीतून बाहेर पडायचे. पण, सोमवारी ते आपल्या खोलीतून बाहेर पडलेच नाहीत, त्यानंतर शिष्य सर्वेश द्विवेदी आणि इतर शिष्यांनी दरवाजा तोडला असता नरेंद्र गिरी यांचा मृतदेह त्यांना लटकलेल्या अवस्थेत आढळला. सर्वेश यांनी आणून दिलेल्या त्याच दोरीने नरेंद्र गिरी यांनी गळफास घेतला होता.
हिमाचल प्रदेशात पावसाचा थैमान, मगील 24 तासात 10 तर या वर्षात 432 जणांचा मृत्यू
आधी औषध पिऊन आत्महत्येची योजनापोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र गिरींनी गळफास घेण्यापूर्वी सल्फास खाऊन आत्महत्या करण्याची योजना आखली होती. पण, नंतर त्यांनी हा विचार सोडून गळफास घेण्याचा विचार केला. पोलिसांना त्यांच्या खोलीतून सल्फासच्या गोळ्यादेखील सापडल्या आहेत. सल्फ़ास अॅल्युमिनियम फास्फाइड आहे, जे धान्याला किड न लागण्यासाठी वापरले जाते.