धुलिवंदनानिमित्त गुरुवारी मद्द विक्री बंद
By admin | Published: March 22, 2016 12:40 AM
जळगाव - धुलिवंदन हा सण २४ रोजी साजरा केला जाणार आहे. या काळात सामाजिक सलोखा व कायदा - सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) नुसार तालुक्याच्या ठिकाणी, जळगाव महानगरपालिका तसेच जिल्ातील अमळनेर, पाचोरा, धरणगाव, यावल, रावेर, फैजपूर, चाळीसगाव, वरणगाव, चोपडा, पारोळा, एरंडोल, सावदा, जामनेर, भडगाव तसेच मुक्ताईनगर व बोदवड या तालुक्याच्या ठिकाणी देशी विदेशी मद्य विक्रीची दुकाने, परमीटरुम, बिअर शॉपी व ताडीची दुकाने संध्याकाळी ६ वाजे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे.
जळगाव - धुलिवंदन हा सण २४ रोजी साजरा केला जाणार आहे. या काळात सामाजिक सलोखा व कायदा - सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) नुसार तालुक्याच्या ठिकाणी, जळगाव महानगरपालिका तसेच जिल्ातील अमळनेर, पाचोरा, धरणगाव, यावल, रावेर, फैजपूर, चाळीसगाव, वरणगाव, चोपडा, पारोळा, एरंडोल, सावदा, जामनेर, भडगाव तसेच मुक्ताईनगर व बोदवड या तालुक्याच्या ठिकाणी देशी विदेशी मद्य विक्रीची दुकाने, परमीटरुम, बिअर शॉपी व ताडीची दुकाने संध्याकाळी ६ वाजे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे.महिला लोकशाहीदिनी ७ अर्ज प्राप्त जळगाव - महिला व बाल विभागातर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या लोकशाही दिनात सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ४ अर्ज ठेवीदारांचे आहेत. तसेच तहसीलदार चोपडा, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झालेत. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी साधना सावरकर यांनी लोकशाही दिनातील प्रलंबित तसेच निकाली अजार्चा आढावा घेतला व संबंधित विभागांनी महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना दिली. मनोधैर्य अंतर्गत दोन पीडितांना मदतजळगाव: महिला जिल्हा सल्लागार समितीची सभा सोमवारी पार पडली. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी साधना सावरकर या होत्या. यावेळी ॲड. शोभन मुळे, निवेदिता ताठे, वासंती दिनेश चौधरी, विमल चौधरी, ॲड.लीलावती चौधरी, प्रा.अनिता मगरे, ॲड. दिलीप पोकळे, मनपाच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापती खुशबु बनसोडे, भारती लोटन पाटील , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे एस. आर. पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोधैर्य योजनेंतर्गत दोन पीडितांना प्रत्येकी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले.