खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पंजाबमधील मोगा येथील रोडेवाल गावात असलेल्या गुरुद्वारातून त्याला अटक करण्यात आली आहे.गेल्या ३६ दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारा ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख शनिवारी रात्रीच गुरुद्वारमध्ये पोहचला. तेथे त्याने ग्रंथीशी बोलून त्याला शरण जायचे असल्याचे सांगितले. याची माहिती ग्रंथींनी पोलिसांना दिली. अमृतपाल गुरुद्वारामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळताच संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली. रोडेगावमध्ये कारवाईचे नियोजन करण्यात आले. यादरम्यान गुरुद्वारा साहिबच्या प्रतिष्ठेची काळजी घेतली जाईल याचीही काळजी घेण्यात आली. पूर्ण खबरदारी घेऊन आज सकाळी ६.४५ वाजता पोलीस फौजफाटा रोडेगाव येथे पोहोचला. तेथून अमृतपालला अटक करण्यात आली.
अमृतपालला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला भटिंडा विमानतळावर नेले. विमानतळावरच त्याचे मेडिकल करण्यात आले. यानंतर पंजाब पोलिसांनी अमृतपालला ताब्यात घेतले आणि कडेकोट बंदोबस्तात दिब्रुगडला रवाना झाले. यादरम्यान त्यांच्यासोबत दिब्रुगडपर्यंत एक डॉक्टरही जाणार आहे. अटक करण्यापूर्वी अमृतपाल सिंगने प्रवचनाच्या वेळीही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला.
अमृतपाल सिंग याला ३६ दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. अजनाळा घटनेनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर एनएसएही लादण्यात आले होते. पंजाब पोलिसांनी अमृतपालला अटक केल्याचे ट्विट केले आहे, त्याला पंजाबमधील मोगा येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही फेक न्यूज शेअर करू नका असंही सांगितले.
अमृतपालने ज्या ठिकाणी आत्मसमर्पण केले ते जनरल सिंग भिंद्रनवाले यांचे गाव आहे. यासोबतच त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो गुरुद्वारामध्ये प्रचार करत आहे. पण फ्रेममध्ये तो एकटाच दिसतो, त्याच्या आजूबाजूला कुणीच नसतं. खरं तर, यावर्षी 23 फेब्रुवारी रोजी अमृतपाल सिंह यांनी आपल्या समर्थकांसह अमृतसरमधील अजनाळा पोलिस स्टेशनवर एका सहकाऱ्याच्या सुटकेची मागणी करत हल्ला केला होता. या प्रकरणावरून पंजाब पोलीस आणि सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.
अमृतपालने ज्या ठिकाणी आत्मसमर्पण केले ते जनरल सिंग भिंद्रनवाले यांचे गाव आहे. यासोबतच त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो गुरुद्वारामध्ये बोलत आहे. पण फ्रेममध्ये तो एकटाच दिसतो, त्याच्या आजूबाजूला कुणीच दिस नाही. यावर्षी २३ फेब्रुवारी रोजी अमृतपाल सिंह याने आपल्या समर्थकांसह अमृतसरमधील अजनाळा पोलिस स्टेशनवर एका सहकाऱ्याच्या सुटकेची मागणी करत हल्ला केला होता. या प्रकरणावरून पंजाब पोलीस आणि सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.