नाट्यगृहाच्या निधीसाठी वित्तमंत्र्यांसोबत चर्चा
By admin | Published: April 05, 2016 12:14 AM
महाबळ परिसरात बंदिस्त नाट्यगृहाचे काम सुरू आहे. निधीसाठी हे काम रखडले आहे. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करीत नाट्यगृहाच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानुसार काही दिवसात निधी उपलब्ध होऊन डिसेंबर अखेर बंदिस्त नाट्यगृहाचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाबळ परिसरात बंदिस्त नाट्यगृहाचे काम सुरू आहे. निधीसाठी हे काम रखडले आहे. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करीत नाट्यगृहाच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानुसार काही दिवसात निधी उपलब्ध होऊन डिसेंबर अखेर बंदिस्त नाट्यगृहाचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जेडीसीसी बँक सभागृहाच्या नूतनीकरणासाठी बीओटीचा पर्यायजिल्हा बँक सभागृहाच्या स्टेजचे काम बँकेमार्फत करण्यात आले आहे. सभागृहातील दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी दोन ते तीन कोटींचा खर्च आहे. त्यामुळे बीओटीचा प्रस्ताव काहीजणांना दिला आहे. मात्र त्यांनी टाकलेल्या अटी या अवास्तव आहेत. यापूर्वी ग.स.बँक तसेच अन्य वित्तीय संस्थांनादेखील आम्ही या कामाबाबत सुचविले असल्याचे त्यांनी सांगितले.चौकटगैरव्यवहार झालेल्या शाखांची चौकशीपीक कर्जाचे वाटप झाल्यानंतर काही ठिकाणी गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार काही कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी गैरव्यवहाराचे आरोप असतील त्या शाखांची चौकशी करून संबंधित कर्मचार्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.