आदेश रावल -
नवी दिल्ली : भाजपने आपल्या पहिल्या यादीत १९५ लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काँग्रेसमध्ये सध्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये (छाननी समिती) उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या समितीने चार राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना रिंगणात उतरवण्याची सूचना केली आहे. छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा आणि दिल्लीतील अनेक नावांवर चर्चा झाली आहे.छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष दीपक बैज आणि ज्योत्स्ना महंत यांना तिकीट देऊ शकते. ७ मार्च रोजी दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात या नावांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दिग्गजांच्या लढाईतून फायदा काय? - बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेबाहेर असल्याचे पक्षाच्या रणनीतीकारांचे मत आहे. - दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यास त्याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर दिसून येईल आणि पक्ष एकदिलाने लढेल. - तसेच जवळच्या जागांचे समीकरण बदलणेही फायदेशीर ठरेल, असे सांगितले जाते.
कोण, कुठून लढणार?राजस्थानमधून सचिन पायलट, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत, बिजेंद्र ओला, भंवर जितेंद्र सिंह, सी.पी. जोशी, हरीश चौधरी यांच्या नावांवरही चर्चा आहे. दिल्लीतून प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली आणि उदित राज यांना तिकीट देण्याचा विचार सुरू आहे. हरयाणातून दीपेंद्र हुड्डा, कुमारी शैलजा आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांना तिकीट दिले जाऊ शकते. दीपेंद्र हुड्डा आणि सुरजेवाला हे दोघेही राज्यसभेचे सदस्य आहेत.
हे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात? -प्रियांका गांधी, सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर त्या रायबरेलीतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवडणूक लढण्याचा परिणाम इतर जागांवर होऊ शकतो.
अशोक गेहलोत १९८० ते १९९८ या काळात जोधपूरमधून लोकसभेच्या सहापैकी पाच निवडणुका जिंकल्या. जोधपूरमधून उमेदवार झाल्यास जालोर, पाली, बाडमेर येथे फायदा.
भूपेश बघेल, माजी मुख्यमंत्रीलोकसभा निवडणूक कधीच लढवली नाही. यावेळी राजनांदगावमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. स्क्रीनिंग कमिटीने त्यांच्या नावावर चर्चा केली आहे.
सचिन पायलट, ते छत्तीसगडचे प्रभारी आहेत, जनतेचा पाठिंबा पाहता त्यांना टोंक-सवाई माधोपूरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. याचा परिणाम अजमेर, दौसा, ढोलपूर-करौली जागांवर होऊ शकतो.
बी. श्रीनिवास, कोरोनाच्या काळात ऑक्सिजन मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. मोदी सरकारच्या विरोधात अनेक निदर्शने झाली. बंगळुरूमधून उमेदवार देत तरुणांना संदेश दिला जाऊ शकतो.
राहुल गांधींची इच्छा : पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीत राहुल गांधी यांनीही इच्छा व्यक्त केलेली आहे की, माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील नेते, सरचिटणीस आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी.
मागील निवडणुकांत काय? -