शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नरेंद्र मोदी-जो बायडेन यांच्यात फोन पे चर्चा, हे मुद्दे राहिले केंद्रस्थानी

By बाळकृष्ण परब | Published: February 09, 2021 7:52 AM

PM Narendra Modi talk with US President Joe Biden : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संपर्क साधत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वपूर्ण मानला जात आहेजो बायडेन यांनी निवडणूक जिंकल्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातील संबंधांप्रमाणेच कायम राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संपर्क साधत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून या चर्चेची माहिती दिली आहे. भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे. PM Narendra Modi talk with US President Joe Bidenजो बायडेन यांनी निवडणूक जिंकल्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातील संबंधांप्रमाणेच कायम राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, बायडेन यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली. त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही प्रादेशिक मुद्द्यांवरील संयुक्त प्राथमिकतेवर चर्चा केली. तसेच आम्ही ग्लोबल वॉर्मिंगविरोधात आपले सहकार्य पुढे सुरू ठेवण्यावर सहमती व्यक्त केली.

मोदी पुढे म्हणाले की,राष्ट्रपती जो बायडेन आणि मी एका नियमाधारीत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी कटीबद्ध आहोत. आम्ही भारत-पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आमि सुरक्षेसाठी आपली रणनीतिक भागीदारी भक्कम करण्यासाठी तत्पर आहोत.जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. अमेरिकेतील यावेळची अध्यक्षीय निवडणूक कमालीची वादग्रस्त झाली होती. या निवडणुकीत जो बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय