- हरीश गुप्तानवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर (पीके) आणि भाजप यांच्यातील कटू वादानंतर अशीच स्पर्धा येत्या फेब्रुवारीत उत्तर प्रदेशात बघायला मिळू शकते. उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार पी.के. यांची उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी लखनौत दीर्घकाळ बैठक झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अखिलेश यादव यांना फोन केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार ही बैठक झाली. पश्चिम बंगालमध्ये पीके यांनी विजयाची व्यूहरचना केली होती. त्यामुळे यादव यांनी भाजपच्या पराभवासाठी पीके यांची मदत घ्यावी, असे बॅनर्जी यांना हवे आहे. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत पीके हे यादव यांच्या फारच थोडे संपर्कात होते, कारण तेव्हा पीके काँग्रेसला सल्ला देत होते.प्रशांत किशोर यांच्या जवळच्या सूत्रांनी यादव-पीके भेटीवर बोलण्यास नकार दिला. मात्र, यादव यांनी त्यांना योजना तयार करण्यास सांगितल्याचे समजते. अखिलेश यादव यांचा विजय व्हावा अशी बॅनर्जी यांची इच्छा आहे. समाजवादी पक्षाला आशाकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. राष्ट्रीय लोकदल त्याचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बळ दाखवत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विरोधक सक्रिय झाल्यामुळे भाजपमध्ये तट पडले आहेत. पक्षाच्या दिल्लीतील श्रेष्ठींच्या पाठिंब्यावर आदित्यनाथ यांचे विरोधक बंडाचा झेंडा उंच करीत असल्याच्या अफवा आहेत. या परिस्थितीमुळे समाजवादी पक्षाला आपण भाजपला पर्याय होऊ शकतो, अशी आशा आहे.
ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 6:16 AM