५०० एकर जागेसाठी आमदारांचा प्रयत्न पाण्यासाठी चर्चा : नशिराबाद शिवारात नवीन सबस्टेशनचे काम सुरु
By admin | Published: February 01, 2016 12:03 AM
जळगाव : औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी तालुक्यात सुमारे ५०० एकर जागेचा शोध सुरू आहे. उमाळा व नशिराबाद भागात इतर उद्योग असल्याने याच क्षेत्रातील जमीन अधिग्रहित करण्याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी प्रयत्न सुरु केले आहे. नवीन उद्योगांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हतनूर व वाघूर धरणावरून व्यावसायिक पद्धतीने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
जळगाव : औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी तालुक्यात सुमारे ५०० एकर जागेचा शोध सुरू आहे. उमाळा व नशिराबाद भागात इतर उद्योग असल्याने याच क्षेत्रातील जमीन अधिग्रहित करण्याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी प्रयत्न सुरु केले आहे. नवीन उद्योगांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हतनूर व वाघूर धरणावरून व्यावसायिक पद्धतीने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.एमआयडीसीच्या विस्तारासाठी जळगाव तालुक्यातील नशिराबाद, कडगाव, उमाळा यापैकी एक गाव दत्तक घेऊन एमआयडीसीचा विकास करण्यात येईल. यासाठी उमाळा व नशिराबाद परिसरात नुकतेच नवीन सबस्टेशन मंजूर करण्यात आले आहे. या भागात पाण्याची समस्या मोठी आहे. त्यासाठी हतनूर व वाघूर धरणातून व्यावसायिकपद्धतीने नियमानुसार पाण्याचेे वाटप करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे.प्लॉट परत घेऊन नवीन उद्योजकांना देणारशहरातील एमआयडीसी भागात अनेक उद्योगांसाठी प्लॉटचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांश प्लॉटवर उद्योगांची उभारणी झालेली नाही तर अनेक उद्योग बंद पडलेले आहेत. अशा प्लॉट धारक व बंद उद्योगांना विनंती करून उद्योग भाडे अथवा भागीदारी तत्त्वावर सुरू करण्याबाबत विनंती केली जाईल. अनेक वर्षांपासून प्लॉट घेऊन उद्योगांची उभारणी न करणार्या प्लॉट धारकांकडून प्लॉट परत घेऊन नवीन उद्योजकांना देण्यात येईल. याबाबत संबंधितांना एमआयडीसीकडून नोटीस देण्यात येणार आहे. ३५ उद्योजकांशी चर्चाशहरासह परिसरात नवीन उद्योग येण्यासाठी टायर, केमिकल सह अन्य जवळपास ३५ उद्योजकांशी चर्चा करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इंदूर, गुजरात राज्य जवळ आहे व वाहतुकीसाठी रेल्वे, महामार्गाची चांगली सुविधा असल्याचे व्हिजन उद्योजकांसमोर ठेवण्यात आले आहे. उद्योगांना परिसरातील नशिराबाद, उमाळा, कडगाव कंडारी सह इतर गावामधून मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे परिसरातील युवकांना रोजगार मिळणे शक्य होईल.