शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

युद्ध नव्हे, चर्चा हाच एकमेव मार्ग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतीन यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 7:05 AM

जी-२० गटाचे अध्यक्षपद  कार्यकाळात भारत कोणती कामे हाती घेणार आहे, याची माहिती मोदी यांनी पुतीन यांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : युक्रेन संघर्षाचा प्रश्न सोडविण्यासाठी राजनैतिक पातळीवर चर्चा करून तोडगा काढणे हाच एकमेव मार्ग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सांगितले. या दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारत व रशियामध्ये ऊर्जा, व्यापार, संरक्षण या क्षेत्रांमध्ये आणखी सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. 

या चर्चेत पुतीन यांनी युक्रेनसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. जी-२० गटाचे अध्यक्षपद  कार्यकाळात भारत कोणती कामे हाती घेणार आहे, याची माहिती मोदी यांनी पुतीन यांना दिली. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची समरकंद शहरात १६ सप्टेंबर रोजी परिषद भरली होती. त्यावेळी मोदी व पुतीन यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. सध्याचे युग युद्धाचे नाही, असे मोदी यांनी पुतीन यांना याआधीही सांगितले होते. (वृत्तसंस्था)

युक्रेनवर रशियाचा ६० क्षेपणास्त्रांचा मारारशियाने युक्रेनमध्ये शुक्रवारी सुमारे ६० क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे युक्रेनच्या चार शहरांमध्ये विविध ठिकाणी स्फोट झाले व काही इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील एका शहरात निवासी इमारतीवर झालेल्या हल्ल्यात दोघे मरण पावले. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे खारकीव शहरात वीज व पाणीपुरवठा बंद पडला आहे. हजारो नागरिकांनी रेल्वे स्थानकांमध्ये आश्रय घेतला.

रशियाने युक्रेनवर गेल्या १० महिन्यांतील सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला शुक्रवारी केला. या क्षेपणास्त्रांपैकी ३७ क्षेपणास्त्रे पाडण्यात युक्रेनच्या लष्कराला यश आले. कीव्ह, क्रिवी रिह, झापोरिझ्झिया, खारकीव या चार शहरांना रशियाने लक्ष्य केले होते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNarendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिन