शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सुरक्षा दलांतील चर्चा; पाकचे शिष्टमंडळ भारतात

By admin | Published: September 10, 2015 3:29 AM

भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलांदरम्यान महासंचालक स्तरावरील चर्चा गुरुवारपासून नवी दिल्लीत सुरू होत असून यावेळी भारतातर्फे सीमेवर वारंवार होणारे शस्त्रसंधी

नवी दिल्ली/ अमृतसर : भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलांदरम्यान महासंचालक स्तरावरील चर्चा गुरुवारपासून नवी दिल्लीत सुरू होत असून यावेळी भारतातर्फे सीमेवर वारंवार होणारे शस्त्रसंधी उल्लंघन आणि घुसखोरीसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जातील. अलीकडेच उभय देशांदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) स्तरावरील चर्चा रद्द झाली असताना ही बैठक होत आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावातच बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे एक १६ सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी येथे डेरेदाखल झाले. पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुक बुर्की करीत असून अमृतसरजवळील अटारी वाघा सीमेवर पंजाब फ्रंटियरच्या सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ कमांडरने त्यांचे स्वागत केले. यापूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये लाहोरला महासंचालक स्तरावरील बैठक झाली होती. दीड वर्षाच्या खंडानंतर ही बोलणी होत आहेत. पाकिस्तानी शिष्टमंडळात सिंध रेंजर्सच्या अधिकाऱ्यांशिवाय तेथील गृहमंत्रालय, सर्व्हे आॅफ पाकिस्तान, अमली पदार्थविरोधी दल आणि स्थलांतरण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर २३ सदस्यीय भारतीय दलाचे नेतृत्व सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक डी.के. पाठक करीत आहेत. पाकिस्तानी उच्चायोगातील सूत्रानुसार भारत आणि पाकिस्तानदरम्यान संयुक्त राष्ट्र सैन्य निरीक्षक गट सक्रिय बनविण्यावर पाककडून जोर दिला जाईल. संयुक्त राष्ट्र गटाची प्रासंगिकता आता राहिली नसल्याचे भारताचे म्हणणे आहे.दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सीमेवर गस्त घालणाऱ्या दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांचे महासंचालक व दोन्ही देशांच्या लष्करांचे ‘मिलिटरी आॅपरेशन्स’चे महासंचालक या विषयावर मोदी व नवाज शरीफ चर्चेवर एकमत झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारताचे चर्चेतील अपेक्षित मुद्देजम्मू-काश्मीर सीमेवर होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांकडून कुठल्याही चिथावणीशिवाय होणाऱ्या गोळीबारात निष्पाप नागरिक आणि जवानांचे मृत्यू होत आहेत.बीएसएफच्या वतीने श्वेत झेंड्याला दुसऱ्या बाजूने प्रतिसाद मिळत नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला जाईल. गोळीबार थांबविण्याचे संकेत या श्वेत झेंड्याने दिले जातात.विविध स्तरावरील संवाद, परस्पर समन्वयाने गस्त आणि विश्वासार्हता वाढविणारे इतर विषय.गुजरातमधील कच्छच्या रणालगतच्या हरामी नाल्यात होणारी घुसखोरी, सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय सीमेवर झीरो लाईन क्षेत्रात संशयास्पद बेकायदेशीर हालचालीपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; २ जवान जखमीश्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा आणि पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. मंगळवारी रात्री पूंछमध्येही पाकने आगळीक केली. त्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.भारतीय अधिकाऱ्यांच्या घरगुती वापराच्या वस्तू अडविल्यानवी दिल्ली : इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयातील चार मुत्सद्दी अधिकाऱ्यांसाठी भारतातून पाठविण्यात आलेली घरगुती वापराच्या वस्तूंची पार्सले पाकिस्तानने महिनाभरापासून वाघा सीमेवर अडवून ठेवली आहेत. भारतातर्फे पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाला वेळोवेळी सूचना देण्यात आल्यानंतरही रेंजर्सनी हे सामान संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते केले नाही. भारत-पाक महासंचालक स्तरावरील बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.