कानपूर: विषप्राशन केल्यानंतर गेले पाच दिवस मृत्यूशी झुंज देणा-या सुरेंद्र कुमार दास या ३२ वर्षांच्या आयपीएस अधिका-याचा रविवारी दुपारी येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दास यांची गेल्याच महिन्यात कानपूर (पूर्व) पोलीस अधीक्षक म्हणून बदलीने नियुक्ती झाली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दास यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.गेल्या बुधवारी दास यांनी शहरातील सरकारी निवासस्थानी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची पत्नी रविना सिंग डॉक्टर आहे. नाकातोंडातूनफेस येत असल्याचे पाहूनपत्नीने त्यांना इस्पितळात दाखल केले होते. घरात दास यांनी लिहिलेली दोन पानांची ‘स्युसाईड नोट’ फाटलेल्या अवस्थेत मिळाली होती. त्यात त्यांनी कोणालाही जबाबदार धरू नये. व्यक्तिगत जीवनातील कटकटींमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिल्याचे कळते.दास यांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शकस्त केली. पण एक एक करत त्यांची सर्व इंद्रिये रक्तप्रवाह थांबून निकामी होत गेल्याने नाईलाज झाला. उपचारांवर जातीने देखरेख करण्यासाठीपोलीस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी इस्पितळातच तळ ठोकला होता. (वृत्तसंस्था)
विषप्राशन केलेल्या तरुण आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 4:14 AM