शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

डिसलाइकचा धसका, मोदींच्या भाषणावेळी भाजपाच्या पेजवरील बटण केलं बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 7:29 PM

Narendra Modi News : पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या पेजवर सुरू असलेल्या भाषणाच्या खालील डिसलाईकचे बटण बंद करण्यात आले होते.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशाची स्थिती चांगली असल्याचे सांगतानाच लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, असे आवाहन देशवासियांना केले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असतानाच ट्रोलिंगची भाजपाला वाटत होती. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या पेजवर सुरू असलेल्या भाषणाच्या खालील डिसलाईकचे बटण बंद करण्यात आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज देशवासियांसाठीचे संबोधन जेमतेम ५ ते १० मिनिटे चालले. दरम्यान, या संबोधनावेळी मोदींचे भाषण सुरू असताना यूट्युब पेजवर मोठ्या प्रमाणात डिसलाईक येऊ लागल्या. त्यामुळे किती जणांनी लाईक किंवा डिसलाईक केलंय ते दिसणार नाही, असं सेटिंग भाजपाच्या आयटी सेलने केले. दरम्यान, काही वेळाने या भाषणाच्या व्हिडिओखालील कमेंटही बंद करण्यात आल्या.दरम्यान, आज देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत कोरोनाविरोधातील लढाईत देशाने मोठा टप्पा पार केला आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली आहे. हळूहळू बाजारातील लगबग वाढत आहे. मात्र याच काळात देशात बेफिकीरी वाढत आहे. लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. काही बेजबाबदार लोक स्वत:ला आणि आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालतात. आता सणावाराचे दिवस आहेत. मात्र थोडीशी बेफिकीरी जीवन उद्ध्वस्त करू शकते. तुम्ही तुमचे कुटुंबीय सुरक्षित, सुखी दिसावे, अशी माझी इच्छा आहे. कोरोनाविरोधातील लस अजून आलेली नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, असे आवाहन मोदींनी केले आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. मोदी म्हणाले की, कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ९० लाखांहून अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ हजार क्वारेंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. देशात सध्या २० कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब आहेत. तसेच देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा