शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

सरन्यायाधीशांची याचिका पद्धत रुचेना; खंडपीठाची नाराजी, पहिल्यांदाच असं घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 5:53 AM

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एका फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीप्रसंगी ही नाराजी व्यक्त केली

नवी दिल्ली : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले खटले जलदगतीने निकाली काढण्याकरिता सरन्यायाधीश उदय लळीत यांनी याचिका सूचिबद्ध करण्याबाबत लागू केलेल्या नव्या पद्धतीबद्दल त्या न्यायालयाच्या एका खंडपीठानेच नाराजी व्यक्त केली आहे. ही सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील दुर्मीळ घटना आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एका फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीप्रसंगी ही नाराजी व्यक्त केली. त्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नव्या सूची पद्धतीमुळे सुनावणीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. दुपारच्या सत्रामध्ये खूप याचिका सुनावणीस येतात. खंडपीठाने हा आदेश १३ सप्टेंबर रोजी दिला आहे.

याचिका सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्याच्या नव्या पद्धतीमुळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दोन वेगळ्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. नव्या पद्धतीप्रमाणे दर आठवड्याच्या सोमवार व शुक्रवारी ३० न्यायाधीशांनी दोन-दोन न्यायाधीशांचे खंडपीठ तयार करावे. प्रत्येक खंडपीठाने ताज्या जनहित याचिकांसह ६० याचिकांची सुनावणी घ्यावी.  

मंगळवार, बुधवार, गुरुवारी न्यायाधीशांनी तीन-तीन न्यायाधीशांचे खंडपीठ तयार करावे. या खंडपीठांनी वर्षानुवर्षे प्रलंबित खटल्यांची दुपारी एक वाजेपर्यंत सविस्तर सुनावणी घ्यावी, असेही याचिकाच्या नव्या सूची पद्धतीत नमूद करण्यात आले आहे. 

५ हजार याचिकांचा झाला निपटारासरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्या पदाची सूत्रे २७ ऑगस्ट रोजी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी याचिकांच्या सुनावणीसाठी नवी सूची पद्धत लागू केली. त्यामुळे आतापर्यंत ५ हजार याचिकांचा निपटारा झाला आहे. त्यामध्ये ३५०० विविध याचिका, नियमित सुनावणी सुरू असलेल्या २५० याचिका, १२०० हस्तांतरणविषयक याचिकांचा समावेश आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय