ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - चुलीत लाकडे अगर गोव-या जाळून केलेल्या विस्तवावर एक तास स्वयंपाक करण्यातून छातीत भरणारा धूर चारशे सिगारेट्स ओढण्याइतका हानीकारक असतो असे एक त्रैराशिक अरुण जेटलींनी मांडले. आणि दारिद्र्य रेषेखालच्या एक कोटी पन्नास लाख कुटुंबांर्पयत या आर्थिक वर्षात सवलतीच्या दरातला स्वयंपाकाचा गॅस पोहोचवण्याची घोषणा केली. आगामी काळात सुमारे पाच कोटी स्वयंपाकघरांमधून चुली हद्दपार करण्याचा संकल्पही त्यांनी सोडला. निमशहरी आणि ग्रामीण भागात गॅस सिलेंडर वितरणाच्या साखळीमुळे ग्रामीण युवकांना उपलब्ध होणारा रोजगारही ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरेल.