लडाखमध्ये चिनी सैनिकांनी धारदार हत्यारे घेऊन भारतीय जवानांवर हल्ल्याचा व चौकी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचे पडसाद आजच्या दोन्ही देशांच्या ब्रिगेडिअर स्तरावरील बैठकीवर उमटले. हॉटलाईनवर सुरु असलेल्या चर्चेत दोन्ही बाजुने बाचाबाची झाल्याने सीमेवर तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सीमेवर जवान चीनची घुसखोरी हाणून पाडत असताना दुसरीकडे सैन्य अधिकाऱ्यांच्या स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु असून चीन भारतातून माघारी जाण्याचे मान्य करत नाहीय. यासाठी ब्रिगेडिअर स्तरावर चर्चा सुरु आहे. हे अधिकारी समोरासमोर बसून चर्चा करतात. मात्र, आज दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये हॉटलाईनवर चर्चा झाली. या अधिकाऱ्यांनी वाढत्या तणावामुळे समोरासमोर येणे टाळले आहे. ही चर्चा वादामध्ये परिवर्तित झाली आहे.
गलवान सारखा धोका; तलवारी, भाल्यासारखी हत्यारे घेऊन चिनी सैनिकांचा जवानांना घेरण्याचा प्रयत्न
लडाखमध्ये मुखपरी पीकवर चिनी सैन्याने गलवानसारखाच धोका देत हल्ला करण्याचा प्रयत्न चालविल्याने दोन्ही देशांच्या ब्रिगेडिअरमध्येही वादावादी झाली. भारताने याचा जाब विचारताच चीनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, चिनी सैन्याने अशाप्रकारची हत्यारे घेऊन जाणे हे मार्शल कल्चर आहे. मात्र, भारताने फायरिंग करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. यावरून भारतीय ब्रिगेडिअरने चीनच्या ब्रिगेडिअरला चांगलेच सुनावले आहे. चीनने पक्के दगडी बांधकाम केले आहे. दगडांच्या भिंती संरक्षणासाठी उभारल्या आहेत. यामुळे सीमेवर तणाव आणखी वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; 'जलयुक्त शिवार' अपयशी ठरल्याचा कॅगचा ठपका
काम करताना इगो नसावा, पण शॉर्टकटही मारू नये; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
चीनची धमकी! भारताने रक्तरंजित संघर्षासाठी तयार रहावे; हद्द पार केली
कंगना मुंबईला निघाली! रोडमॅप तयार; मनालीहून एक दिवस आधीच रवाना
मुंबईला पीओके बोलणे कंगनाला भोवले; विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा