शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

४ लाख कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकांचे कामकाज विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 3:19 AM

विलीनीकरणाला विरोध; सलग तिसऱ्या दिवशी बँका राहिल्या बंद

नवी दिल्ली : सरकारी बँकांच्या विलीनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात अधिकारी व कर्मचारी संघटनांनी दिलेल्या संपाच्या आवाहनाला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मंगळवारी झालेल्या या संपात ८ लाखांपैकी निम्मे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी देशभर ठिकठिकाणी निदर्शनेही केली.

यामुळे कोणत्याच सरकारी बँकेत पूर्णपणे कामकाज झाले नाही. अनेक बँकांतील पैसे जमा करणे आणि काढणे यासाठीच्या खिडक्या बंद होत्या. त्यामुळे खातेदारांची अडचण झाली. संपामुळे बँकांमधील धनादेशांचे क्लीअरन्सचे कामही थांबले. रविवारच्या सुटीनंतर सोमवारीही विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील बँका बंदच होत्या. अनेक एटीएमपुढे बरीच गर्दी झाली होती. दुपारपर्यंत एटीएममधील पैसेही संपल्याने तेथून रक्कम काढण्याचा पर्यायही बंद झाला.

दिवाळी तोंडावर आली असताना कर्मचारी संपावर गेले असल्याने अनेकांना आपल्या बोनसची रक्कम बँकेतून काढता आली नाही. यंदा काही कंपन्यांनी कर्मचाºयांचे पगार दिवाळीमुळे लवकर खात्यात जमा केले आहेत. पण ती रक्कमही अडकून पडली आहे, तर काहींचे चेक क्लीअर झाले नाहीत. या संपामुळे आमचे कामकाज होऊ शकलेले नाही, असे अनेक बँकांच्या व्यवस्थापनांनीही मान्य केले.

आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन व बँक एम्प्लॉइज फेडरेशन आॅफ इंडिया या दोन डाव्या संघटनांनी संपाचे आवाहनकेले होते. आधी भाजपशी संबंधित बँकेने संपात सहभागी होण्याचे ठरविले होते. मात्र मतभेदामुळे ती संघटना संपातून बाहेर पडली. तरीही ५0 टक्के कर्मचारी संपात सहभागी होते. बँकांच्या विलीनीकरणाच्या विरोधाबरोबरच वेतनवाढ व अन्य मागण्याही कर्मचाºयांनी केल्या आहेत. पाच दिवसांचा आठवडा हीही कर्मचाºयांची मागणी आहे. कर्मचारी संघटनांनी जी वेतनवाढ मागितली आहे, ती देण्यास बँका तयार नाहीत. कर्मचारी संघटना व बँकांचे व्यवस्थापन यांच्यात चर्चा सुरू असली तरी सर्वमान्य तोडगा निघालेला नाही.

टॅग्स :bankबँक