नाशिक : इगतपूरी तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत हद्दीत मोठया प्रमाणात अतिक्र मण असताना ग्रामपंचायत अधिकार्यांनी सदाशिव हरिभाऊ सूर्यवंशी या एकमेव व्यापार्यांचे दुकानातील व दुकानासमोरिल अतिक्र मण काढले . घोटी शहरात इतर अतिक्र मण ही काढण्यात यावे, अन्यथा उपोषणाला बसन्याचा ईशारा सूर्यवंशी यांनी पंचायत समितिच्या गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. इगतपुरी तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणुन घोटी शहराची ओळख आहे. शहराचे विस्तारीकरण होत असताना अतिक्र मण ही वाढले,असे असतांना संबंधित अधिकार्यांनी सुडबुद्धिने माझ्या एकट्याच्याच दुकानासमोरिल पत्र्याचे शेड आणि दुकानातील अतिक्र मण काढले आहे.कोट- लोकशाहित सर्वाना नियम सारखे असताना ,माझ्यावर अन्याय होत आहे .याचा शासनाने विचार करु ण शहरातील सर्व अतिक्र मण काढून लोकशाहीचे अस्तीत्व अबाधीत ठेवावे- सदाशिव सूर्यवंशी , घोटी कोट :- घोटी शहरातील अतिक्र मन विषयी १ फेब्रुवारी २०१६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली आहे.अतिक्र मण काढन्या संदर्भात पाठपुरावा सुरु असून सार्वजनिक बांधकाम खात्यालाही पत्र देण्यात आले आहे. - संजय बेनाडे ,ग्रामसेवक , घोटी ग्रामपंचायत.
घोटितील अतिक्र मण मोहिमेत दुजाभाव,उपोषणाचा ईशारा
By admin | Published: February 08, 2016 10:56 PM