भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:45 AM2022-09-27T07:45:00+5:302022-09-27T07:45:32+5:30

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या

Dissatisfaction in BJP is also in front rajasthan challenge to pacify Vasundhara Raje rajasthan political crisis sachin pilot ashok gelhlot | भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान

भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान

googlenewsNext

हरीश गुप्ता 
नवी दिल्ली : राजस्थानमध्येकाँग्रेस पक्षाला संकटाचा सामना करावा लागत असतानाच राज्य भाजपामधील असंतोषही समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्याशी संबंधित समस्येवर भाजपा नेतृत्वही झगडत आहे. 

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाचा पराभव झाल्यापासून त्या अधिक सक्रिय नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया यांना जानेवारी २०१९मध्ये विरोधी पक्षनेते आणि सतीश पुनिया यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. २०२०मध्ये सचिन पायलट यांनी २०हून अधिक आमदारांसह आपली ताकद दाखविली. या ऑपरेशन लोटसमध्येही वसुंधरा राजे यांचा सहभाग नव्हता. जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत हे वसुंधरा राजे यांची नव्हे तर, भाजप नेतृत्त्वाची निवड आहेत, हेही नंतर दिसून आले. 

भाजपाच्या चुकीच्या भूमिकेमुळे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आणि काँग्रेसचे काही आमदार सचिन पायलट यांच्या नियंत्रणातून बाहेर पडले. विधानसभा निवडणुकीला १५ महिने बाकी असताना भाजपा नेतृत्व आता स्वत:चे घर व्यवस्थित ठेवत आहे. २०० सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे ७१ आमदार आहेत आणि २०२३च्या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे भाजपा सर्व गटांना एकत्र आणण्यास उत्सुक आहे. 

केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा ?  
अलिकडच्या काळात भाजपा नेतृत्व वसुंधरा राजे यांना महत्त्वाच्या कार्यक्रमात निमंत्रित करुन शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले असले तरीही त्या मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय राहिल्या आहेत.
भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वसुंधरा राजे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केले जाऊ शकते. दुष्यंत सिंह हे चार वेळा लोकसभेचे खासदार झालेले आहेत. 

Web Title: Dissatisfaction in BJP is also in front rajasthan challenge to pacify Vasundhara Raje rajasthan political crisis sachin pilot ashok gelhlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.