ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 1 - राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून उफाळलेल्या यादवीमुळे सपमध्ये शहा काटशहाचे राजकारण जोरात आहे. आज सकाळी रामगोपाल यादव यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता मुलायम यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून हे अधिवेशन बेकायदेशीर ठरवले आहे, तसेच अधिवेशन बोलावणाऱ्या रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आता पुढील वाटचाल ठरवण्यासाठी मुलायम यांनी 5 जानेवारी रोजी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे मुलायम यांच्या समाजवादी कुटुंबात सुरू झालेला कलह अधिकच वाढला आहे.
Mulayam Singh Yadav expels Ramgopal Yadav for 6 years from Samajwadi Party— ANI UP (@ANINewsUP) 1 January 2017
आज सकाळी लखनऊत झालेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची सपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच शिवपाल यादव यांची पक्षाच्या उत्तर प्रदेश अध्यक्षपदावरून उचलबांगडी करतानाच अमर सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबते सर्व प्रस्ताव रामगोपाल यांनीच अधिवेशनात मांडले होते. त्यानंतर उपस्थितांनी त्याला जोरदार अनुमोदन दिले होते. दरम्यान, त्यामुळे संतप्त झालेल्या मुलायम यांनी रामगोपाल यांना पुन्हा एकदा पक्षातून बाहेरची वाट दाखवली. आता 5 जानेवारीला मुलायम यांनी बोलावलेल्या सपच्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष असेल.
Mulayam Singh Yadav says some people want to benefit the BJP by insulting him and the same people called today's National Exec Meet pic.twitter.com/1d5YGUlvKV— ANI UP (@ANINewsUP) 1 January 2017
दरम्यान, शिवपाल यादव यांनी ट्विट करून हा निर्णय आज दुपारी मुलायम सिंग यांच्या घरी आयोजित बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच रामगोपाल यांचे निलंबन कायम असल्याने त्यांना पक्षाचे अधिवेशन बोलावण्याचा कोणताही अधिकार नसून, संसदीय मंडळाने त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केल्याचेही त्यांनी सांगितले.Ram Gopal Yadav's expulsion has been approved by Samajwadi Party's Parliamentary Board Meeting held at Shri Mulayam Singh Yadav's residence— Shivpal Singh Yadav (@OfficeOfShivpal) 1 January 2017
Expulsion of Ram Gopal Yadav is still valid and he has no authority to call a National Convention— Shivpal Singh Yadav (@OfficeOfShivpal) 1 January 2017