जिल्हा रुग्णालयात बाळाच्या अपहरणाचे पेव संशयास्पदरीत्या फिरणारी महिलेमुळे गोंधळ : सखोल चौकशीत अपहरणाचा प्रकार नसल्याचे उघड; चौकशीअंती महिलेची सुटका
By admin | Published: March 29, 2016 12:24 AM
जळगाव : जिल्हा रुग्णालयात संशयास्पदरीत्या फिरणार्या महिलेमुळे चांगलाच गोंधळ उडाला. बाळाचे अपहरण करण्याच्या उद्देशाने ती फिरत असल्याच्या संशयावरून रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, सखोल चौकशीत तसा कोणताही प्रकार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तिची रात्री सुटका केली. या प्रकारामुळे रुग्णालयात एकच हलकल्लोळ माजला होता. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
जळगाव : जिल्हा रुग्णालयात संशयास्पदरीत्या फिरणार्या महिलेमुळे चांगलाच गोंधळ उडाला. बाळाचे अपहरण करण्याच्या उद्देशाने ती फिरत असल्याच्या संशयावरून रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, सखोल चौकशीत तसा कोणताही प्रकार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तिची रात्री सुटका केली. या प्रकारामुळे रुग्णालयात एकच हलकल्लोळ माजला होता. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.रामानंदनगर बस थांब्याजवळ राहत असलेली एक महिला सोमवारी दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात फिरत होती. प्रसूती वॉर्डात तिला सुरक्षा रक्षकांनी हटकल्याने ती घाबरली. सुरक्षा रक्षकांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्याने ती गोंधळली. गोंधळात तिने उलटसुलट उत्तरे देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून तिला पकडले. या प्रकारादरम्यान, एका महिलेस बाळ पळवताना पकडल्याच्या अफवा रुग्णालयात पसरल्याने गर्दी झाली. त्यानंतर तिला जिल्हा पेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.पोलीस ठाण्यात ओळखपरेडया महिलेला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिची सखोल चौकशी करण्यात आली. तिने आपण शिवाजीनगर भागातील मूळ रहिवासी असून गेल्या काही दिवसांपासून रामानंदनगरात एका व्यक्तीसोबत राहत असल्याचे सांगितले. माहिती देताना ती, पोलिसांना आपण बाळ चोरणारी महिला नाही. मला एक लहान मुलगी आहे. माझी सासू महिनाभरापासून घरातून निघून गेली असून तिला शोधण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्याचे गयावया करून सांगत होती. तिने दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी तिला सोबत घेऊन पोलीस रामानंदनगरात तिच्या घरी गेले. शेजारच्या महिलांनीदेखील तीच माहिती सांगितल्याने ती खरे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. तेथून पुन्हा तिला सोबत घेऊन पोलीस परत ठाण्यात आले. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन रात्री तिची सुटका करण्यात आली.महिलेची कहाणी वेगळीच...ही महिला शिवाजीनगरातील मूळ रहिवासी आहे. काही दिवसांपासून ती रामानंदनगरात राहणार्या एका व्यक्तीसोबत राहू लागली. याच काळात तिची वृद्ध सासू घरातून निघून गेली. तिच्यामुळेच हा प्रकार घडल्याने सासूला तिने शोधून आणावे, म्हणून तिला त्रास दिला जात होता. सोमवारी सकाळी असाच प्रकार घडल्याने ती सासूला शहरात शोधत होती. उद्याने, बसस्थानक, रेल्वेस्थानक शोधून झाल्यावर ती जिल्हा रुग्णालयात पोहोचली होती. त्याठिकाणी हा गोंधळ उडाला.