पतीने कुत्र्याच्या निराधार पिल्लाला घरी आणल्याने 'ती' अस्वस्थ; पत्नीनं घेतला टोकाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:50 PM2023-02-17T12:50:37+5:302023-02-17T12:51:17+5:30
उत्तराखंडमधील उधमसिंग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उधमसिंग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे कुत्र्याच्या लहान पिल्लावरून पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. खरं तर हा वाद इतका वाढला की पत्नीने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या माहेरच्यांनी पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हुंड्यासाठी हत्येचा आरोप करत मृत महिलेच्या भावाने पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
पतीने निराधार पिल्लाला घरी आणले होते
पोलीस चौकी बन्नाखेडा अंतर्गत बल्ली येथील रहिवासी सूरज सैनी यांनी बुधवारी कुत्र्याच्या एका निराधार पिल्लाला घरी आणले. एसएसआय विक्रम सिंगधामी यांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, पिल्लाला घरी आणल्याने पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता.
घरात गळफास घेऊन केली आत्महत्या
घरात कुत्र्याच्या पिल्लाला आणल्याने नाराज होऊन 21 वर्षीय उर्मिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशासनाच्या उपस्थितीत पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी काशीपूर येथे पाठवला. मृत महिलेचा भाऊ दिनेश याने पती व इतर सासरच्या मंडळींवर पोलीस चौकी बनखेडा येथे तक्रार देऊन हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच लग्नानंतर सासरच्यांनी हुंड्यात बुलेट बाईकच्या मागणीसाठी उर्मिलाचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"