गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकर्यांच्या मुलांना वा वाटप
By admin | Published: May 16, 2016 12:44 AM
जळगाव : सपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी खेडेगावामध्ये नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यात अवकाळी पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर नुकसानही होत आहे. राज्य शासन व सेवाभावी संस्था शक्य तेवढी मदतही त्यासाठी करीत आहेत. १७ मे रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती बघता वाढदिवसाच्या जाहिराती, फलक, पुरवण्या आदी गोष्टीवर खर्च न करता दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना वांचे वाटप करून महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा निर्णय महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतलेला आहे. जळगाव महानगरपालिकेचे महापौर नितीन ला यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यामध्ये खान्देश विकास आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी, मनसेचे नगरसेवक उपस्थित होते.
जळगाव : सपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी खेडेगावामध्ये नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यात अवकाळी पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर नुकसानही होत आहे. राज्य शासन व सेवाभावी संस्था शक्य तेवढी मदतही त्यासाठी करीत आहेत. १७ मे रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती बघता वाढदिवसाच्या जाहिराती, फलक, पुरवण्या आदी गोष्टीवर खर्च न करता दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना वांचे वाटप करून महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा निर्णय महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतलेला आहे. जळगाव महानगरपालिकेचे महापौर नितीन ला यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यामध्ये खान्देश विकास आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी, मनसेचे नगरसेवक उपस्थित होते.यावेळी महापौर नितीन ला यांनी एक लाख वा, उपमहापौर ललित कोल्हे यांनी ५० हजार वा, नगरसेवक कैलास सोनवणे यांनी ५० हजार वा देण्याचा तत्काळ निर्णय बैठकीत घोषित केला. यावेळी महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे, कैलास सोनवणे, माजी उपमहापौर सुनील महाजन, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, चेतन शिरसाळे, संदेश भोईटे, अजय पाटील, ममता संजय कोल्हे, ज्योती इंगळे, मनसेचे बंटी जोशी, सुनील पाटील, खुशबू बनसोडे, लीना पवार, सुरेश सोनवणे, राष्ट्रवादीचे जाकीर पठाण, राजू मोरे, लता मोरे, गायत्री शिंदे, शालिनी काळे, चेतन संकट, भाजपाच्या शुचिता हाडा, अश्विन सोनवणे, अतुलसिंह हाडा, सुनील माळी, नितीन पाटील, पिंटू काळे आदी उपस्थित होते. महापौर नितीन ला यांनी नागरिकांनाही या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गतवर्षातील अभ्यासक्रमाची पुस्तके या उपक्रमामध्ये द्यावयाची तेही देऊ शकतात. ही सर्व मदत देण्यासाठी शहरातील शिवाजी पुतळ्यासमोरील ना.गिरीष महाजन यांच्या संपर्क कार्यालयाशी किंवा राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौफुलीजवळील ला फार्म हाऊस याठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या दरम्यान संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.