ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २८ - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या 'पद्म' पुरस्कारांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा पार पडला. 56 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर इतर मान्यवारांना 12 एप्रिल रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
धीरुभाई अंबानी (मरणोत्तर) - रिलायन्स समूहाचे संस्थापक (महाराष्ट्र), श्री. श्री रविशंकर, अभिनेता रजनीकांत यांना पद्मविभूषण पुरस्कार तर प्रियांका चोप्रा, अॅड. उज्वल निकम, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेता अनुपम खेर, मूर्तिकार राम सुतार, गायक उदित नारायण यांचादेखील पद्मभूषण पुरस्कारात समावेश आहे.
विशेष म्हणजे लोकमत समूहाचे फोटो एडिटर आणि ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचाही या पुरस्कारांच्या यादीत समावेश असून त्यांना 'पद्मश्री' किताब जाहीर झाला आहे.
याशिवाय समाजातील अनेक मान्यवरांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
#PresidentMukherjee presented 5 Padma Vibhushan, 8 Padma Bhushan & 43 Padma Shri awards at Rashtrapati Bhavan today pic.twitter.com/StsKIGalnV— President of India (@RashtrapatiBhvn) March 28, 2016