जिल्ाचा कारभार तीन डीवायएसपींच्या हाती पाच जागा रिकाम्याच : अतिरिक्त कारभाराचा ताण
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
अहमदनगर : जिल्ातील आठपैकी पाच पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या तीन अधिकार्यांवर अन्य उपविभागांचा अतिरिक्त कारभाराचा ताण पडला आहे. एका गुन्ाचा तपास सुरू असताना दुसरीकडे लक्ष द्यावे लागत असल्याने एकाही गुन्ाचा तपास तडीस नेण्यातील अधिकार्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अतिरिक्त कारभाराची जबाबदारी दर दोन दिवसाला बदलली जात असल्याने अधिकारीही त्रस्त झाले आहेत.
अहमदनगर : जिल्ह्यातील आठपैकी पाच पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या तीन अधिकार्यांवर अन्य उपविभागांचा अतिरिक्त कारभाराचा ताण पडला आहे. एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना दुसरीकडे लक्ष द्यावे लागत असल्याने एकाही गुन्ह्याचा तपास तडीस नेण्यातील अधिकार्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अतिरिक्त कारभाराची जबाबदारी दर दोन दिवसाला बदलली जात असल्याने अधिकारीही त्रस्त झाले आहेत.जिल्ह्यात पोलीस दलाचे आठ उपविभाग आहेत. संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, अहमदनगर, अहमदनगर ग्रामीण, पोलीस मुख्यालय उपविभाग, शेवगाव, कर्जत अशा आठ उपविभागांचा समावेश आहे. सध्या नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील, कर्जतचे उपअधीक्षक धीरज पाटील आणि श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक राकेश ओला हे तीनच अधिकारी कार्यरत आहेत. शिर्डी येथील उपअधीक्षक विवेक पाटील यांची पदोन्नती झाल्याने त्यांना तेथून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तेथे अद्याप नव्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शेवगाव येथील उपअधीक्षक संजय पाटील हे गेल्या महिनाभरापासून रजेवर आहेत. त्यांच्याकडे जवखेडा येथील दलित हत्याकांडाचा तपास देण्यात आला होता. मात्र ते आजारी पडल्याने ते रजेवर गेले आहेत. त्यांचा अतिरिक्त पदभार वाय.डी. पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. कधी त्यांच्याकडे शेवगाव, तर कधी नगर ग्रामीण भागाचा पदभार देण्यात येत असल्याने कोणत्या भागावर लक्ष केंद्रीत करावे, याबाबत त्यांचीही द्विधा मनस्थिती झाली आहे.नगर ग्रामीण आणि पोलीस मुख्यालयाच्या उपअधीक्षक अशा दोन्ही ठिकाणी अनिता जमादार या काम पाहत होत्या. त्या सहा महिन्यांच्या रजेवर आहेत. त्यांचा पदभारही पाटील यांच्याकडे आहे. पोलीस मुख्यालयाचे उपअधीक्षक म्हणून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संगमनेर उपविभागाच्या उपअधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवरही उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी अद्याप नियुक्त केला नसल्याने श्रीरामपूरचे ओला यांच्याकडेच संगमनेरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.--------