जिल्हा बॅँकेची वावडदा शाखा फोडली रोकड सुरक्षित : बॅँक फोडण्याची तिसरी घटना
By admin | Published: February 12, 2016 10:45 PM
जळगाव: शहराप्रमाणेच ग्रामीण भागात आता चोरी व घरफोडीचे सत्र सुरू झाले असून तालुक्यातील वावडदा येथे गुरुवारी मध्यरात्री जिल्हा बॅँकेची शाखा फोडण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. तिजोरी भक्कम असल्यामुळे त्यातील तीन लाख ३८ हजार रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली आहे. दरम्यान, यापूर्वीही याच शाखेत दोन वेळा चोरीचा प्रयत्न झाला होता.
जळगाव: शहराप्रमाणेच ग्रामीण भागात आता चोरी व घरफोडीचे सत्र सुरू झाले असून तालुक्यातील वावडदा येथे गुरुवारी मध्यरात्री जिल्हा बॅँकेची शाखा फोडण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. तिजोरी भक्कम असल्यामुळे त्यातील तीन लाख ३८ हजार रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली आहे. दरम्यान, यापूर्वीही याच शाखेत दोन वेळा चोरीचा प्रयत्न झाला होता.शुक्रवारी सकाळी आठ वाजता ग्रामस्थांना बॅँकेचे कुलूप व कोयंडे उघडे दिसले. त्यांनी लागलीच शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत न्याती व म्हसावद पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस कॉन्स्टेबल सुशील मगरे यांनी साडे आठ वाजता वावडदा गाठून पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना चोरीबाबत माहिती कळविली. यावेळी बॅँकेतील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. तिजोरीही फोडण्याचा प्रयत्न झालेला दिसून आला. व्यवस्थापक न्याती आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. बॅँकेची तिजोरी उघडून पाहिली असता त्यातील रक्कम सुरक्षित होती. चोरट्यांनी तिन्ही कुलूपे गायब केली आहेत.चार वर्षापूर्वीही घडली होती घटनायाच बॅँकेत चार वर्षापूर्वी चोरीचा प्रयत्न झाला होता. तेव्हाही खिडक्या व दरवाजाचे कुलूप कापण्यात आले होते. तसेच त्याआधीही असाच प्रकार घडला होता. सातत्याने घटना घडूनही बॅँक प्रशासनाने ना सुरक्षा रक्षक नेमला ना सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. या चोरीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पोलीस अधिकार्यांनी या भागात रात्रीची गस्त सुरू केली होती, मात्र त्यानंतर ही गस्त बंदच झाली आहे. वावडदा, जळके व म्हसावद येथे बॅँका असल्याने तसेच सततच्या घटनांमुळे पोलिसांची गस्त पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.बॅँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांची भेटचोरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बॅँकेचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश पाटील व अन्य अधिकार्यांनी भेट देवून पाहणी केली, तर इतकी मोठी घटना घडूनही पोलीस अधिकार्यांनी साधी भेट दिली नाही. म्हसावद दूरक्षेत्राचे सहायक फौजदार राजाराम पाटील व सहकार्यांनीच फक्त भेटी दिल्या.