दिवे घाटाचे अवघड वळण पार ! माऊली सासवडमध्ये : आज दिंडीकर्यांची बैठक
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM
बाळासाहेब बोचरेसासवड : चपापतं ऊन अन् अवघड दिवे घाट पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संध्याकाळी सासवडमध्ये दाखल झाली. वारकर्यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पालखी तळावर दिंडी समाजाची बैठक होणार आहे.एकादशी असल्याने उपाशीपोटी हरिनामाचा जयघोष करीत असताना निसर्ग रविवारी वारकर्यांची परीक्षाच पाहत होता. शिंदे छत्री, हडपसर, उरळी देवाची अशी वाटचाल ...
बाळासाहेब बोचरेसासवड : चपापतं ऊन अन् अवघड दिवे घाट पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संध्याकाळी सासवडमध्ये दाखल झाली. वारकर्यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पालखी तळावर दिंडी समाजाची बैठक होणार आहे.एकादशी असल्याने उपाशीपोटी हरिनामाचा जयघोष करीत असताना निसर्ग रविवारी वारकर्यांची परीक्षाच पाहत होता. शिंदे छत्री, हडपसर, उरळी देवाची अशी वाटचाल करीत सोहळ्याने दिवे घाटाच्या पायथ्याशी दोन तास विश्रांती घेतली आणि घाट चढण्यास प्रारंभ केला.नाम विठोबाचे घ्यावे। मग पाऊल टाकावे।। या अभंगाप्रमाणे अवघड घाटाचे आव्हान पेलण्यासाठी नामाचे बळ वारकर्यांमध्ये संचारते. चढणीचा रस्ता आणि तळपते ऊन यामुळे वारकरी घामाघूम झाले. तरीही दोन तासांत हा घाट पार करून पालखी झेंडेवाडी येथे विसाव्याला आली.२५० रुग्णांवर उपचारवाट बिकट असल्याने अनेक वारकर्यांना दम लागणे, रक्तदाब वाढणे, चक्कर येणे अशा तक्रारी आल्या असून वारकर्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. २५० रुग्णांवर उपचार केल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले.--------------------------आज सोपानकाकांचे प्रस्थानघटकाभराच्या विश्रांतीनंतर निघालेली पालखी सायंकाळी संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत दाखल झाली. संत सोपानकाकांच्या पालखीचे सोमवारी पंढरपूरसाठी प्रस्थान होणार असून तत्पूर्वी दोन्ही पालख्यांचे वारकरी एकत्र आल्याने जणू बंधूभेटच झाल्याची प्रचिती येत होती.-------------प्रचंड गर्दीपुणे ते सासवड अशी मर्यादित वारी करणार्या पुणेकरांसाठी रविवार म्हणजे पर्वणीच होती. त्यामुळे दिवे घाटात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे पालखी सोहळा १५ मिनिटे उशिरा पोहोचला. गर्दीमुळे अनेक वाहनांच्या क्लच प्लेट उडाल्याने वाहने रस्त्यात खोळंबून राहिली.-------------------------------