Diwali Bonus Gift Viral: दिवाळी जवळ आली की सरकारी अथवा खासगी कर्मचाऱ्यांना बोनसची आतुरता असते. कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून भेटवस्तू किंवा पैसे दिले जातात. काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मिठाई, सुका मेवा आणि गिफ्ट व्हाउचर यांसारख्या वस्तू देतात, तर काही कंपन्या मोठ्या वस्तू देतात, ज्याची देशभर चर्चा होते.
आज आम्ही तुम्हाला अशा कंपनीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तूची देशभर चर्चा होत आहे. तमिळनाडूच्या कोटागिरी शहरात असलेल्या चहाच्या मळ्याच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून चक्क रॉयल एनफिल्ड बाईक्स दिल्या. तर, तिकडे हरियाणातील पंचकुला येथील एका फार्मास्युटिकल कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्या.
कोटागिरीतील 190 एकर चहाच्या मळ्याचे मालक पी शिवकुमार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत गृहोपयोगी वस्तू आणि रोख बोनस भेट दिला होता, परंतु यावर्षी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बाईक देण्याचा निर्णय घेतला. या चहाच्या मळ्यात गेल्या दोन दशकांपासून सुमारे 627 कर्मचारी कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी व्यवस्थापक, पर्यवेक्षक, स्टोअरकीपर, कॅशियर, फील्ड स्टाफ आणि चालकांसह 15 कर्मचाऱ्यांना बाईक भेट दिल्या. आपल्या नवीन दुचाकीच्या चाव्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर पी शिवकुमार त्यांच्यासोबत फिरायलाही गेले. इ
तिकडे, हरियाणाच्या पंचकुलातील फार्मास्युटिकल कंपनी Mits Healthcare Pvt Ltd ने सांगितले की, त्यांनी 12 कर्मचाऱ्यांना कार भेट देण्याबरोबरच, या दिवाळीत इतर 38 लोकांना त्यांच्या पुरस्कार जाहीर केला आहे. एका निवेदनात कंपनीने म्हटले की, कंपनीचे संचालक एमके भाटिया आपल्या कर्मचाऱ्यांना 'सेलिब्रेटी' म्हणतात. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांना त्यांनी गाड्या देण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात आणखी 38 कर्मचाऱ्यांना कार देणार आहेत.