पिरंगुटच्या भवानी टेकडीवर दिवाळी पहाट
By admin | Published: November 15, 2015 9:13 PM
श्रोते मंत्रमुग्ध : बालचमुंनी गायली भाव व भक्ती गीते
श्रोते मंत्रमुग्ध : बालचमुंनी गायली भाव व भक्ती गीतेपौड : पिरंगुट येथील भवानी टेकडीवर मुळशी तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांनी लावलेल्या दीपांनी भवानी टेकडीचा परिसर उजळून निघाला. या निमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार अशोक मेमाणे व त्यांच्या समवेतच्या बालकलाकारांनी सादर केलेल्या आपल्या भाव व भक्ती गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिरंगुटच्या सरपंच ललिता पवळे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ वाघमुख हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या वक्त्या म्हणून श्रद्धा वाळिंबे यांनी आपल्या भाषणातून दिवाळी पर्वणीचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी पिरंगुटच्या माजी सरपंच सुरेखा पवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर पवळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक दत्ता आल्हाट, अनिल चोंधे, मधुकर भोसले, पांडुरंग चव्हाण व पंचक्रोशीतील अनेक भाविक उपस्थित होते. अभिजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.