नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणूका सोमवारी जाहीर झाल्या. देशात दिवाळी साजरी होत असताना, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये मात्र राजकीय बार उडणार आहेत.
कॉंग्रेस, भाजप यांच्यात प्रमुख लढत होत असली, तरी सर्व राज्यांत लहान-मोठे अनेक पक्ष आपला जोर लावणार आहे. पाचही राज्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांभोवती निवडणूक केंद्रित असेल, मागील निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या, याविषयीचा हा थोडक्यात आढावा...