शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 78 दिवसांचा बोनस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 4:48 PM

Modi Cabinet : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने आज रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, रेल्वेच्या 11.27 लाख कर्मचाऱ्यांना 1,832 कोटी रुपयांचा प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस दिला जाईल. त्याची कमाल मर्यादा 17,951 रुपये असणार आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

तेल वितरण कंपन्यांना एकरकमी अनुदानयासोबतच मंत्रिमंडळाने तेल वितरण कंपन्यांना 22000 कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान दिले आहे. जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत वाढ होऊनही देशांतर्गत बाजारात एलपीजीच्या किमती त्याच प्रमाणात न वाढल्याने जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गुजरातमध्ये बांधले जाणार कंटेनर टर्मिनल याचबरोबर,पत्रकार परिषदेत कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, गुजरातमधील (Gujarat) कांडला येथे दीनदयाल बंदर प्राधिकरणाअंतर्गत कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय कार्गो बर्थ ( Multi Purpose Cargo Berth) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

मंत्रिमंडळातील इतरही निर्णय...पूर्वोत्तर राज्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी PM-devine योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना चार वर्षांसाठी (2025-26 पर्यंत) असणार आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाने बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2022 मंजूर केले आहे, जे बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002 मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये 97 व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदींचा समावेश असणार आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. 

रेल्वेवर 1832.09 कोटी इतका बोजारेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यासाठी रेल्वेवर 1832.09 कोटी इतका बोजा पडणार आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी पेमेंट म्हणून दरमहा 7000 रुपये दिले जातात. 78 दिवसांनुसार कर्मचार्‍यांना बोनस म्हणून 17,951 रुपये दिले जातील. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात रेल्वेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कोरोना महामारीच्या काळातही रेल्वेने अनेक आर्थिक लक्ष्य गाठले आहे. 2021 मध्ये माल वाहतुकीत 184 मिलियन टनापर्यंत वाढ झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस प्रोत्साहन कामासाठी दिले जाते. 

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारीNarendra Modiनरेंद्र मोदीAnurag Thakurअनुराग ठाकुर