ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली - दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आज केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्याची घोषणा केली. 1 जुलै 2016 पासून नवा महागाई भत्ता लागू होणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर 2015 मध्ये महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर मार्च 2016 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 6 टक्क्यांनी वाढून125 टक्के करण्याची घोषणा केली. सध्या सुमारे 1 कोटी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना 119 टक्के महागाई भत्ता दिला जातो. फेब्रुवारी महिन्यातच सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची योजना केली होती. महागाई भत्त्यातील वाढीचा 48 लाख कर्मचारी व 55 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. गेल्या वर्षभरातील महागाई दराच्या आकडेवारीचा अभ्यास करुन सरकारतर्फे वर्षात दोनवेळा महागाई भत्त्यात बदल केला जातो. यापुर्वी मार्च २०१६ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ करण्यात आली होती.