भयंकर! ब्रेक फेल झाल्याने डीजे ट्रक गर्दीत घुसला; 13 जखमी, 3 भाविक गंभीर, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:27 AM2021-12-27T08:27:33+5:302021-12-27T08:35:27+5:30

DJ Van Accident : दुर्घटनेत 13 भाविक जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती ही अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

DJ Van Accident during religious function in chhindwara madhya pradesh | भयंकर! ब्रेक फेल झाल्याने डीजे ट्रक गर्दीत घुसला; 13 जखमी, 3 भाविक गंभीर, Video व्हायरल

भयंकर! ब्रेक फेल झाल्याने डीजे ट्रक गर्दीत घुसला; 13 जखमी, 3 भाविक गंभीर, Video व्हायरल

Next

नवी दिल्ली - धार्मिक कार्यक्रम सुरू असताना एक डीजे ट्रक थेट भाविकांच्या गर्दीत घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर डीजे ट्रेक समोर असणाऱ्या भाविकांना चिरडत पुढे गेला आहे. या दुर्घटनेत 13 भाविक जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती ही अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाड्यामध्ये ही घटना घडली. सर्व जखमींना सौसर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर जखमींपैकी एक भाविक महाराष्ट्रातील रहिवासी आहे. पवन हेमराज भोंगर (जामगाव, महाराष्ट्र), जय नंदू तुमराम (नंदनवाडी पांडूर्णा) आणि करण अंतराम सलामे (पांडूर्णा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दुर्घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी डीजेची तोडफोड केली. सर्व भाविक जाम सावलीतील हनुमान मंदिरात पदयात्रा करीत चालले होते. भाविकांच्या मागोमाग डीजे लावलेला मिनी ट्रक चालला होता. मात्र ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक अनियंत्रित झाला आणि भाविकांच्या गर्दीत घुसला. 

तीन भाविक गंभीर जखमी 

ट्रकच्या पुढे भक्तिगीतांच्या तालावर नाचण्यात मग्न असलेले भाविक ट्रकखाली चिरडले गेले. जखमींना तात्काळ सौसर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे रेफर केले. या दुर्घटनेत तीन भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी भाविक इकडे तिकडे पळू लागल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

डीजे ठेवलेल्या मिनी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रक यात्रेत घुसला

एसडीओपी एसपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवार असल्याने सर्व भाविक जाम सावली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनासाठी चालले होते. हनुमान दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. पदयात्रा पांढुर्णा येथून जाम सावली येथे आली होती. पांढुर्णातील हजारो भाविक या पदयात्रेत सहभागी झाले होते. अचानक यात्रेतील डीजे ठेवलेल्या मिनी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रक यात्रेत घुसला. ट्रकच्या छतावरही काही भाविक बसले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: DJ Van Accident during religious function in chhindwara madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.