नवी दिल्ली : कर्नाटककाँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना पक्ष नेतृत्त्वाने मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेसकडून नवीन अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, दिल्लीच्या काँग्रेस अध्यक्षपदी अनिल चौधरी यांची नियुक्ती केली आहे. तसेच, ईश्वर खांद्रे, सतिश जारकीहोळी आणि सलीम अहमद यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
डी. के. शिवकुमार हे कर्नाटकमधील काँग्रेसचे वोक्कालिंगा समाजातील एक प्रमुख नेते आहेत. कर्नाटकात ते डी. के. एस च्या नावाने प्रसिद्ध आहेत. मागील सिद्धारामय्या सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री होते. याआधी 2009 मध्ये डी. के. शिवकुमार यांना काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते.
कर्नाटकातील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये डी. के. शिवकुमार यांचा समावेश होता. 2013 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली 250 कोटींची मालमत्ता जाहीर केली होती, त्यामध्ये आता वाढ होऊन जवळपास 600 कोटी इतकी झाली आहे.
डी. के. शिवकुमार आज काँग्रेसबरोबर असले तरी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून त्यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले. 1985 मध्ये त्यांनी वोक्कालिंगा समाजाचे मोठे नेते एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध वयाच्या पंचविसाव्या वर्षी निवडणूक लढविली होती.
आणखी बातम्या...
'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात'
खूशखबर! येत्या 10 दिवसांत पेट्रोल, डिझेल 5-6 रुपयांनी होणार स्वस्त
काँग्रेसमध्ये नवं नेतृत्व मान्यच होत नाही; ज्योतिरादित्य शिंदेंचा 'गांधीगिरी'वर निशाणा
ज्योतिरादित्य शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण...