Congress ( Marathi News ) : आज केंद्र सरकाने अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रीया येत आहेत. कर्नाटककाँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल, असं वक्तव्य डी के सुरेश यांनी केले. यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
मालदीवने रंग बदलले, तरीही भारताने बजेटमध्ये दुप्पट पैसे दिले; का आणि कशासाठी?
"डीके सुरेश किंवा इतर कोणत्याही नेत्याने दक्षिण भारताच्या वेदना बोलल्या आहेत. अर्थसंकल्पात समतोल असायला हवा. संपूर्ण देश एक आहे. हिंदी पट्ट्याकडे बघा. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेचे समान वाटप नाही. कर्नाटक केंद्राला भरपूर महसूल देत आहे. संपूर्ण दक्षिण भारतासाठी कोणतीही मोठी घोषणा या अर्थसंकल्पात केलेली नाही, असा आरोप डी के शिवकुमार यांनी केला. केंद्राने आम्हाला निराश केले आहे. पण संपूर्ण देश एक आहे. आम्ही भारतीय आहोत. भारताने एकसंध असले पाहिजे, असंही डी के शिवकुमार म्हणाले.
डी के सुरेश यांचं वक्तव्य काय?
कर्नाटकचेकाँग्रेस खासदार डी के सुरेश यांनी अर्थसंकल्पानंतर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्र डी के शिवकुमार यांचे भाऊ असलेल्या सुरेश यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल, असे वक्तव्य सुरेश यांनी केले आहे. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून भाजपाने सुरेश यांच्यावर टीका केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना डीके सुरेश यांनी वरील वक्तव्य केले आहे. केंद्राने आम्हाला जे पैसे देणे बाकी आहेत ते जरी आम्हाला दिले तर ते पुरेसे होईल. जीएसटी म्हणून जमा केलेले कर, सीमाशुल्क आणि प्रत्यक्ष कर आमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. दक्षिण भारतासोबत खूप चुकीचे घडतेय हे आम्ही पाहत आहोत, असा आरोप सुरेश यांनी केला.