'डीएमके'ने लोकसभेसाठी उमेदवारांची यादी केली जाहीर; २१ नेत्यांना दिली संधी, घोषणा पत्रात मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:56 PM2024-03-20T12:56:42+5:302024-03-20T13:07:14+5:30
तामिळनाडू येथील डीएमके पक्षाने आज लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून तामिळनाडूमध्ये १९ एप्रिल रोजी लोकसभेसाठी निवडणुका होणार आहेत.
देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली असून सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तामिळनाडू येथील डीएमके पक्षाने आज लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून तामिळनाडूमध्ये १९ एप्रिल रोजी लोकसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या यादीत २१ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. डीएमके यासोबत घोषणापत्रही प्रसिद्ध केले आहे. लोकसभेसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली आहे. या आघाडीत डीएमके पक्षाचाही समावेश आहे.
एका मुलाला सावरण्याच्या नादात, हातातला दुसरा लेक निसटला; अंगावर काटा आणणारा Video
तामिळनाडूमध्ये ३९ लोकसभेच्या जागा आहेत. यातील २१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर ९ जागांसाठी काँग्रेस नावे जाहीर करणार आहे. आययुएमएल, एमडीएमके आणि केएमडीके यांना प्रत्येकी एक, एक जागा मिळाली आहे. तर सीपीएम, व्हीसीके, सीपीआय यांना प्रत्येकी दोन जागा मिळणार आहेत.
काँग्रेस तामिळनाडूत ९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस कृष्णगिरी, तिरुवल्लूर, कुड्डालोर, करूर, शिवगंगाई, मायिलादुथुराई, तिरुनेलवेली, विरुधुनगर आणि कन्याकुमारी लोकसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.
डीएमके उमेदवारांची यादी
चेन्नई उत्तर- डॉ. कलानिधि वीरसैमी
चेन्नई दक्षिण -अमिलाची थंगापंडियन
चेन्नई सेंट्रल - दयानिधि मारन
श्रीपेरुमबुदुर- डॉ. बालू
कांचीपुरम- जी. सेल्वम
अराकोणम- एस. जगत्रस्तका
वेल्लोर -खातिर आनंद
धर्मपुरी- ए. मणी
तिरुवन्नामलाई -अन्नादुरई
अरणि - धरानिवेंदन
कल्लाकुरिची -मलयारासन
सेलम सेल्वागणपथी -सेलम सेल्वागणपथी
इरोड - प्रकाश
नीलगिरी- ए. राजा
कोयंबटूर- गणपति राजकुमार
पोलाची -इस्वरासैमी
पेरम्बलुर -अरुण नेहरू
तंजावुर -मुरासोली
तेनी -थंगा तमिलसेल्वन
तूथुकुडी -कनिमोझी
तेनकासी- डॉ. रानी श्रीकुमार
तामिळनाडूमध्ये घोषणापत्रही केले जाहीर
आज तामिळनाडूमध्ये लोकसभेसाठी डीएमके पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी लोकसभेसाठी घोषणापत्रही जाहीर केले. डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन म्हणाले- आम्ही राज्यभर जाऊन वेगवेगळ्या लोकांचे म्हणणे ऐकले. हा केवळ द्रमुकचा जाहीरनामा नाही, तर जनतेचा जाहीरनामा आहे. २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यावर त्यांनी भारताचा नाश केला. निवडणुकीतील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. आम्ही इंडिया आघाडी युती केली आहे आणि आम्ही २०२४ मध्ये आमचे सरकार स्थापन करू. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही तामिळनाडूसाठी विशेष योजना जाहीर केल्या असून या जाहीरनाम्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी योजना दिल्या आहेत.
#WATCH चेन्नई: तमिलनाडु के सीएम एमके स्टालिन, डीएमके सांसद कनिमोझी और अन्य पार्टी नेताओं की मौजूदगी में डीएमके ने आगामी लोकसभा चुनाव के लिए अपना घोषणापत्र जारी किया। pic.twitter.com/0AsHXQCQVc
— ANI_HindiNews (@AHindinews) March 20, 2024