शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

तामिळनाडूत राज्यपाल vs सरकार; मंत्र्याची राज्यपालांवर भाजप एजंट असल्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 3:36 PM

DMK Hits Out Governor RN Ravi: तमिळनाडूतील डीएमके सरकारने राज्यपालांकडे फाईल पाठवली, राज्यपालांनी स्वाक्षरी न करता परत केली.

DMK Hits Out Governor RN Ravi: दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूत सरकार vs राज्यपाल परिस्थिती निर्माण होत आहे. स्टॅलिन सरकारमधील मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यापासून केंद्र सरकार आणि द्रमुक यांच्यातही शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. यातच तामिळनाडूचे मंत्री के पोनुमुदी यांनी गुरुवारी (15 जून) राज्यपाल आरएन रवी यांच्यावर भाजप एजंट असल्याची टीका केली.

द्रमुक सरकारकडून सेंथिल बालाजी यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार इतर कोणाला तरी देण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांच्याकडे फाइल पाठवण्यात आली होती. राज्यपालांनी ती फाईल परत केली. यानंतर स्टॅलिन सरकारमधील मंत्री पोनुमुदी यांनी राज्यपाल आर.एन. रवी यांच्यावर टीका करत, भाजप एजंटसारखे वागू नका असे म्हटले.

दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती - राज्यपालमीडिया रिपोर्टनुसार, मंत्री पोनुमुदी यांनी सांगितले की, सीएम एमके स्टॅलिन यांनी व्ही सेंथिल बालाजी यांच्याऐवजी इतरांना मंत्रिपद देण्यासंदर्भातील फाईल राज्यपालांनी परत केली. फाईलमध्ये दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती असल्याचे कारण देत राज्यपालांनी फाईल परत केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाच्या बैठकीनंतर पोनुमुदी म्हणाले की, पुन्हा एकदा राज्यपाल आर.एन. रवी यांच्याकडे फाइल पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला वाटतं की, राज्यपाल ही फाईल मान्य करतील आणि भाजपच्या एजंटसारखे वागणार नाहीत, अशी टिप्पणीदेखील त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम