Tamilnadu News: तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये नवीन मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली. यासाठी द्रमुक आमदार उद्घाटनाला आले. यावेळी त्यांनी स्वतः बस चालवली. पण, त्यांनी पहिल्याच दिवशी बस खड्ड्यात घातली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखावत झाली नाही. हा घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
द्रमुक आमदार सीव्हीएमपी एझिलारासन यांच्या मतदारसंघात बुधवारी एका नवीन बस मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. सरकारी बसला हिरवा झेंडा दाखवून आमदारांनी बस चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खांबाला धडकली. एवढंच नाही तर खांबाला धडकल्यानंतर बस खड्ड्यात गेली.
आमदार आणि लोकांनी बसला धक्का दिलाबस खड्ड्यात अडकल्याने स्वतः आमदार, द्रमुक पक्षाचे कार्यकर्ते व इतरांना खाली उतरून बसला धक्का मारुन खड्ड्यातून बाहेर काढली. या अपघातामुळे बसच्या काही भागाचेही नुकसान झाले आहे. या संपूर्ण घटनेनंतर बस चालकाने बसचे स्टेअरिंग हातात घेतले. सुदैवाने या घटनेत कोणत्या व्यक्तीला हानी झाली नाही.