नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. कोरोनग्रस्तांची संख्या ही तब्बल 5 लाखांच्या वर गेली असून हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. देशात काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीसही आपल्या कुटुंबापासून दूर राहून, जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र काम करत आहे. मात्र याच दरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
तामिळनाडूमध्येही अशीच एक घटना घडली आहे. ई-पास मागितला म्हणून एका नेत्याने दादागिरी करत पोलिसाला धक्काबुक्की केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी नेत्याला ई-पास दाखवण्याची विनंती करताच ते संतापले आणि रागाच्या भरात पोलिसांवरच दादागिरी करण्यास सुरुवात केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूचे खासदार आणि DMK पक्षाचे नेते अर्जुनन यांनी पोलिसांवर दादागिरी केली आहे. अर्जुनन आपल्या गाडीतून प्रवास करत असताना ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांच्या एका टीमनं त्यांना थांबवलं. पोलिसांनी सलेम चेक पोस्टवर अर्जुनन यांची गाडी रोखली आणि लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक असणाऱ्या ई-पासची मागणी केली. ई-पास मागताच अर्जुनन यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसाला धक्काबुक्की केली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि इतरांनी हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्जुनन शांत झाले आणि आपल्या गाडीत बसून निघून गेले. पोलिसांवर केलेल्या दादागिरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल
अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्...
CoronaVirus News : ...म्हणून कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; 'या' आमदाराने केली मागणी
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा खंडाळा घाटात अपघात
CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा
"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"