शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शेतकऱ्यांना द्यावा लागेल टॅक्स? १० लाख रुपये उत्पन्न असल्यास कठोर प्राप्तिकर तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 7:10 AM

आता देशातील अतिश्रीमंत शेतकरी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. कृषी उत्पन्न करमुक्त असले तरी, ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न १० लाखांहून अधिक आहे, त्या शेतकऱ्यांची प्राप्तिकर विभाग माहिती घेणार आहे.

नवी दिल्ली :

आता देशातील अतिश्रीमंत शेतकरी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. कृषी उत्पन्न करमुक्त असले तरी, ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न १० लाखांहून अधिक आहे, त्या शेतकऱ्यांची प्राप्तिकर विभाग माहिती घेणार आहे. त्यामुळे आता श्रीमंत शेतकऱ्यांच्या करमुक्त दाव्याची चौकशी केली जाणार आहे. संसदेच्या लोक लेखा समितीला भारत सरकारने ही माहिती दिली.

शेतीतील उत्पन्नावर सरसकट करसवलत देण्याच्या नियमात अनेक त्रुटी असल्याचे लोक लेखा समितीने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने ही माहिती समितीला दिली आहे. संसदीय समितीच्या प्रश्नांना उत्तरे देताना केंद्रीय वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, त्यांच्या उत्पन्नाची प्राप्तिकर विभाग कडक तपासणी करेल.

५० हजार कोटी जमा करणारपूर्वाश्रमीच्या नियोजन आयोगाने जारी केलेल्या एका पेपरनुसार, ०.०४ टक्के मोठी शेतकरी कुटुंब आणि ३० टक्क्यांच्या बॅकेटमधील कृषी कंपन्यांवर कर लावला तर, वर्षाला ५० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल.

कागदपत्रांची तपासणीच नाही- लोक लेखा समितीने आपला ४९ वा अहवाल मंगळवारी जारी केला. भारतीय महालेखापाल व नियंत्रक यांच्या अहवालाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अहवालात म्हटले आहे की, २२.५ टक्के प्रकरणांत प्राप्तिकर विभागाने कागदपत्रांची योग्य समीक्षा व पडताळणी न करताच करसवलत मंजूर केली आहे. त्यामुळे कर चुकवेगिरीला वाव मिळाल्याचे दिसून आले. - छत्तीसगढमधील एका प्रकरणात तर १.०९ कोटी रुपयांच्या कृषी उत्पन्नावर करसवलत देण्यात आली आहे. या प्रकरणात ना कागदपत्रांची तपासणी करण्यात आली ना समीक्षा आदेशात त्याची चर्चा करण्यात आली.

...तरी राजकारणी लोक घाबरत आहेतप्राप्तिकर कायद्यानुसार शेतीतून मिळणारे उत्पन्न प्राप्तिकरातून वगळण्यात आले आहे. यात प्रत्यक्ष पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच शेतीचे भाड्याचाही समावेश आहे. माजी प्राप्तिकर अधिकारी नवलकिशोर शर्मा यांनी सांगितले की, ‘शेती उत्पन्नावर कर लावण्याचा नुसता उल्लेख केला, तरी राजकारणी लोक घाबरतात. बहुतांश गरीब शेतकऱ्यांना करसवलत मिळायला हवी; मात्र मोठ्या शेतकऱ्यांना सवलत देण्याचे काहीएक कारण नाही.’

राज्यनिहाय शेतकरी उत्पन्नझारखंड- ४८९५मध्य प्रदेश- ८,३३९नागालँड- ९,८७७ओरिसा-  ५,११२

टॅग्स :FarmerशेतकरीIncome Taxइन्कम टॅक्स