गुगल सर्वात शक्तिशाली सर्च इंजिन आहे. काहीही माहिती हवी असेल तर गुगलचा वापर केला जातो. मात्र तुम्ही गुगलवर काहीही सर्च करू शकत नाही. काही गोष्टी अशाही आहेत की, ज्या बेकायदेशीर आहेत. गुगलवर काही कंटेट शोधल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. आज आम्ही तुम्हला कंटेटबाबत माहिती देणार आहोत.
बॉम्ब बनलवण्याची पद्धत अनेकदा लोक अशा गोष्टी सर्च करतात, ज्यांना काही अर्थ नसतो. मात्र असं केल्याने ते स्वतः ला अडचणीत आणू शकतात. बॉम्ब बनवण्याची पद्धत हा शब्द चुकूनही सर्च करू नका. अशी चूक केल्यास त्यावर सायबर सेलची नजर असते. अशी चूक केल्यास सुरक्षा यंत्रणा तुमच्यावर कारवाई करू शकतात.तसेच तुम्हाला तुरुंगातही जावं लागू शकतं.प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओसोशल मीडिया किंवा गुगलवर प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओ लीक करणे हाही गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे तुम्हाला तुरुंगातही जावं लागू शकतं. गर्भपात कसा करावागर्भपाताची पद्धत सर्च करणे हाही गुन्हा मानला जातो. असं अजिबात करू नका. भारतीय कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करता येत नाही.चाइल्ड पोर्नोग्राफीचाइल्ड पोर्नोग्राफीबाबत भारत सरकारची भूमिका कठोर आहे. गुगलवर चाइल्ड पोर्न सर्च करणे, पाहणे किंवा शेअर करणे गुन्हा आहे. असं केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. फिल्म पायरसीचित्रपट रिलीज होण्यापूर्वी ऑनलाईन लीक करणे हा गुन्हा आहे. भारत सरकारने यासाठी ३ वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा तरतुदीमध्ये ठेवली आहे.