ऑनलाइन लोकमत
फतेहाबाद, दि. ११ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी काय काय करायला लावतील हेच कळत नाही असे विधान हरियाणामधील भाजपा नेते व सामाजिक मंत्री कृष्णकुमार बेदी यांनी केले आहे. या विधानावर बेदींनी आणखी भाष्य करणे टाळले आहे.
जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त हरियाणामधील फतेहाबाद येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बेदी यांनी हातात झाडू घेऊन परिसरात साफसफाई केली. माहित नाही मोदी आणखी काय काय करायला लावतील अशी प्रतिक्रिया दिली. माझे विधान रेकॉ़र्ड करु नका अन्य मारच खाऊ असेही त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. बेदी यांच्या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला असला तरी त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवल्याची चर्चा हरियाणातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.