नवी दिल्ली : ‘पान मसाला’मध्ये कॅन्सरला जन्म देणारी घातक सुपारी मिसळण्यात येते. त्यामुळे आपल्या पतींना पान मसालाच्या उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या जाहिरातीत भाग घेण्यापासून रोखा, अशी विनंती दिल्ली सरकारने शाहरुख खान, अजय देवगण, अरबाज खान आणि गोविंदा या बॉलीवूडमधील अभिनेत्यांच्या पत्नींना केली आहे.दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने याआधी या चार अभिनेत्यांना पान मसाला उत्पादनांच्या जाहिराती न करण्याची विनंती एका पत्राद्वारे केली होती; परंतु त्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दिल्ली सरकारने आता त्यांच्या पत्नींना पत्र लिहिले आहे.या पान मसालांमध्ये तंबाखू किंवा निकोटिन नसले तरी त्यात सुपारी असते आणि सुपारीमुळेही कॅन्सर होतो, हे वैज्ञानिक तपासात स्पष्ट झालेले आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘व्यापक जनहित लक्षात घेऊन पान मसाला उत्पादनांच्या जाहिरातीत सहभागी होऊ नये यासाठी आपापल्या पतींना तुम्ही प्रोत्साहन द्या,’ असे शाहरुख खानची पत्नी गौरी हिच्यासह अन्य तीन अभिनेत्यांच्या पत्नींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पतीला पान मसाल्याची जाहिरात करू देऊ नका!
By admin | Published: March 03, 2016 3:37 AM