नवी दिल्ली - मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वारंवार अडचणीत सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या लहान मोठ्या नेत्यांची हजेरी घेतली असून, वादग्रस्त वक्तव्ये करू नका, प्रसारमाध्यमांशी बोलताना संयम बाळगा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
यावेळी मोदींनी सोशल मीडियावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला नेत्यांना दिला. तसेच खासदारांचे त्यांच्या चांगल्या कामासाठी कौतुक केले. तसेच जनधन योजना, कौशल विकास योजना, मुद्रा योजना यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. पंतप्रधानांनी खासदार आणि आमदारांसोबत ग्रामविकास आणि शेतकऱ्यांच्या हितांसदर्भात चर्चा केली. तसेच पंचायत स्तरावर विकासकार्यांसंदर्भात चर्चा केली.