पोकळ विधाने करू नका; केंद्राकडे शिष्टमंडळ न्या, कर्नाटक काँग्रेसची बोम्मईंकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 07:58 AM2022-12-29T07:58:32+5:302022-12-29T07:59:02+5:30
मुख्यमंत्री केवळ पोकळ विधाने करत आहेत, याचे आश्चर्य वाटत नाही, असे डी. के. शिवकुमार म्हणाले.
बंगळुरू: ‘महाराष्ट्राबरोबरच्या सीमावादावर पोकळ विधाने करून तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा केंद्राकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ न्या आणि त्याचे नेतृत्व करा,’ असे आवाहन कर्नाटककाँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केले.
कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, या बोम्मई यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत जाहीर आश्वासन देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री केवळ पोकळ विधाने करत आहेत, याचे आश्चर्य वाटत नाही, असेही ते म्हणाले.
सीमावादावर ठराव मंजूर
दोन राज्यांमधील सीमावादाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील ८६५ मराठी भाषक गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याचा कायदेशीर पाठपुरावा करण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाने मंगळवारी एकमताने मंजूर केला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"