नवी दिल्ली : प्रसारमाध्यमांनी वृत्त आणि मतमतांतरे यांना एकमेकांत मिसळू नये, असे उद्गार केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी काढले. ते म्हणाले की, देशहितासाठी प्रसारमाध्यमांनी स्वयंशिस्त अंगी बाणवण्याची गरज आहे. त्यांच्या हस्ते येथे विभागीय संपादक परिषदेच्या चेन्नई बैठकीचे उद््घाटन झाले. मात्र त्यांनी देशहितासाठी स्वंयशिस्त म्हणजे काय, याचा तपशील दिला नाही. प्रसारमाध्ममांसमोर आव्हाने आहे ती दर्जा, विश्वसनीयता आणि जबाबदारी टिकवून ठेवण्याची. सोशल मीडियाने स्वंयशिस्तीचे व सेन्सॉरशिपचे पारंपरिक प्रकार धुडकावून लावले आहेत, असे ते म्हणाले. सरकारने प्रसारमाध्यमांशी संपर्क ठेवल्यामुळे ते सरकारी कार्यक्रमांना प्रसिद्धी देऊ शकतात. विभागीय संपादक परिषदेचा हा प्रयत्न म्हणजे सरकारच्या कार्यक्रमांना शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविणे. देशाच्या प्रगतीमध्ये प्रसारमाध्यमे ही भागीदार असून विकासामध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. सोशल मीडियामुळे लोकांचा सहभाग वाढला विभागीय वृत्तपत्रांनी खप आणि महसुलात प्रगती केल्याबद्दल आनंद होत आहे, असे सांगून नायडू म्हणाले की तेही महत्त्वाचे आहे. लोकांशी संपर्क साधण्यासाठी विभागीय प्रसारमाध्यमे महत्त्वाचे साधन आहे. सोशल मीडियामुळे लोकांचा सहभाग वाढला आहे. दारिद्र्य भ्रष्टाचार, असमानता एवढेच काय दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी माहिती हे फार मोठे शस्त्र असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणि मते एकत्र करू नयेत
By admin | Published: September 02, 2016 2:34 AM