पाटणा - राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अहंकारी आणि दुर्योधनाची उपमा दिली होती. त्यानंतर आता बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नरेंद्र मोदींची तुलना जल्लादशी केली आहे. पत्रकारांनी राबडी देवी यांना प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख दुर्योधन असा केला आहे असं सांगितलं. तेव्हा 'प्रियंका गांधी यांनी दुर्योधन म्हणत चूक केली आहे, ते जल्लाद आहेत' असं राबडी देवी यांनी म्हटलं आहे.
राबडी देवी यांनी 'प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख दुर्योधन असा करत चूक केली आहे. त्यांना दुसरी भाषा बोलायला हवी. ते सगळे जल्लाद आहेत. जे न्यायाधीशांची हत्या करतात, त्यांचं अपहरण करतात. अशा व्यक्तीचे विचार किती क्रूर असतील' असं म्हटलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अहंकारी आणि दुर्योधनाची उपमा दिली होती. यावरून शहा यांनी प्रियंका गांधींना लक्ष्य केलं होतं. प्रियंकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही म्हटलं म्हणून कुणीही दुर्योधन होत नाही. त्यामुळे, 23 मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? असे अमित शहांनी म्हटलं होतं.
भाजपा अध्यक्ष अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी सभा घेतली होती. त्यावेळी बोलताना, शहा यांनी प्रियंका गांधींना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत टीका केली होती. या टीकेचा काँग्रेसकडून समाचार घेतला. देशपातळीवरील काँग्रेस नेते मोदींच्या टीकेला उत्तर देत आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदींना अहंकारी म्हटले होते. तसेच, राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांच्या कवितेच्या माध्यमातून प्रियंका यांनी मोदींवर टीका केली होती. हरयाणा येथील प्रियंका गांधींच्या या सभेचा अमित शहांनी पश्चिम बंगालमधील रॅलीत समाचार घेतला. देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रियंकाजी तुमच्या म्हणण्यानुसार कुणीही दुर्योधन होणार नाही. 23 मे रोजी कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन हे आपल्याला दिसून येईल, असे म्हणत शहा यांनी प्रियंका गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.
राबडी देवींकडून बलात्काऱ्याचं समर्थन; म्हणाल्या, हे यादवांना बदनाम करण्याचे षड्यंत्र
राबडी देवी यांनी काही दिवसांपूर्वी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आपल्याच पक्षातील एका माजी आमदाराचं समर्थन केलं होतं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरजेडीचा आमदार राजवल्लभ याला सरकारने या प्रकरणात फसवलं आणि तुरुंगात टाकलं. इतकच नाही तर असे करून यादवांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राबडी देवी यांनी केला होता. नवादा येथे एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राबडी देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावरही जोरदार टीका केली होती. आरजेडीकडून बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राजवल्लभ याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. विभा देवी यांच्या प्रचारासाठी आलेल्या राबडी देवी यांनी त्यांचा प्रचार करताना राजवल्लभ कसा निर्दोष आहे आणि सरकारकडून त्याला कसं फसवण्यात आले आहे हे सांगून त्याचं समर्थन केलं. राबडी देवी यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राजवल्लभ याला सरकारने या प्रकरणात फसवलं आणि तुरुंगात टाकलं. इतकच नाही तर असे करून यादवांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. राजवल्लभला न्यायालयाने दोषी ठरवले असताना देखील राबडी देवी यांनी त्याचे समर्थन केले होते.