बेंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी नव्या वादात सापडले आहेत. जेडीएसच्या एका स्थानिक नेत्याची हत्या केल्याप्रकरणी फोनवर बोलताना त्यांनी हल्लेखोराला तमा न बाळगता मारून टाका, असे आक्षेपार्ह विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, हे प्रकरण शेकणार याची कल्पना येताच त्यांनी भावनिक प्रतिक्रिया होती. असा कोणताही आदेश दिला नसल्याची सारवासारव केली आहे.
जेडीएसचे स्थानिक नेते प्रकाश (वय 50) यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यांची पत्नी जिल्हा पंचायतची माजी अध्यक्ष होती. प्रकाश हे कारने मद्दूरला जात होते. हल्लेखोरांनी कारचे दरवाजे उघडून गोळीबार केला. चार दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रकाश यांना गंभीर हालत मध्ये मंड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
हे ऐकून संतप्त झालेल्या कुमारस्वामी यांनी ''प्रकाश भला माणूस होता. माहित नाही कोणी मारले. पण त्या नराधमाला दया न दाखवता ठार करा. काही समस्या नाही.'', असे फोनवर बोलताना सांगितले.