शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

८० आमदारांचा धाक दाखवू नका, तेजस्वी प्रकरणी स्पष्टीकरण द्या - जेडीयू

By admin | Published: July 14, 2017 8:59 PM

आरजेडीने आपल्या ८० आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १४ -  बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) या सत्ताधारी महाआघाडीतील पक्षांमध्ये निर्माण झालेले मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आरजेडीने आपल्या ८० आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला आहे.  राष्ट्रीय जनता दलाचे बिहार अध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी आपल्या पक्षाकडे ८० आमदारांचे बळ असल्याचे वक्तव्य केले होते. 
जेडीयूचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते संजय सिंह म्हणाले, आरजेडीने आपल्या ८० आमदारांचा गर्व बाळगू नये. त्यांनी २०१०मधील आपली २२ आमदारांची संख्या लक्षात ठेवली पाहिजे. २०१५ साली आरजेडीच्या वाढलेल्या आमदारांच्या संख्येमध्ये नितीश कुमार यांच्या विश्वासार्ह चेहऱ्याचा मोठा हात होता हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधाल रेल्वेच्या हॉटेल घोटाळ्या प्रकरणी आरोप झाले असून, त्यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अधिक वाचाबिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोन
सध्या २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे ८०, संयुक्त जनता दलाचे ७१, काँग्रेसचे २७ आणि भाजपाचे ५३ आमदार आहेत.  दरम्यान, जेडीयू आणि आरजेडीमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मध्यस्थी केली आहे. बिहारमधील महागठबंधनचे सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. 
नितीश कुमारांनी या प्रकरणी कणखर भूमिका घेत तेजस्वी यादव संबंधी निर्णय घेण्यासाठी लालुंना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या सरकारची प्रतिमा स्वच्छ असावी असा नितीश कुमारांचा आग्रह आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी मंत्रिमंडळात राहू नये असे त्यांचे मत आहे. पण तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत अशी भूमिका राजदने घेतली आहे. त्यामुळे बिहारमधील जदयू-राजद-काँग्रेस महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे.